File Photo : UPI
आजच्या काळात डिजिटल पेमेंटचा वापर दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. लोक छोट्या छोट्या कामांसाठीही डिजिटल पेमेंटचा वापर करतात. युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) ची लोकप्रियता लोकांमध्ये लक्षणीय वाढली आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NCPI) सतत UPI अपडेट करत आहे. जेणेकरून यूजर्सना अधिक चांगल्या सुविधा मिळू शकतील. त्यातच आता यात एका नवीन अपडेटची यात भर पडली आहे. या अपडेटचे नाव आहे UPI Lite. हे इंटरनेटशिवाय देखील वापरले जाऊ शकते. त्याचबरोबर हे अपडेट कीपॅडसह मोबाईल फोनवरही वापरता येते.
UPI Lite ची वैशिष्ट्ये काय आहेत?
UPI Lite मध्ये पैसे ट्रान्सफर करण्यासाठी ग्राहकांना इंटरनेटची गरज लागणार नाही, कारण ते ऑन-डिव्हाइस वॉलेट वैशिष्ट्यावर काम करते. यामध्ये ग्राहक इंटरनेटशिवाय लहान रक्कम ट्रान्सफर करू शकतात. UPI Lite BHIM app, Paytm आणि PhonePe वर वापरता येऊ शकते. UPI Lite वापरून, तुम्ही २४ तासांत ४,००० रुपये ट्रान्सफर करू शकता. यात व्यवहारांच्या संख्येवर कोणतीही लिमिट लावण्यात आलेली नाही.
UPI द्वारे पैसे ट्रान्सफर करताना ग्राहकांना 6 किंवा 4 अंकी पिन आवश्यक असतो. तथापि, UPI Lite मध्ये, PIN शिवाय पैसे ट्रान्स्फर केले जाऊ शकतात. ही सेवा कमी किंवा खराब नेटवर्कमध्ये देखील काम करते.
BHIM ॲपवर UPI लाइट सक्रिय कसे करावे:






