Google Map Update: इंटरनेटशिवाय गुगल मॅप दाखवणार रस्ता, अशा पद्धतीने सेव्ह करा ऑफलाईन लोकेशन
गुगल मॅप्समध्ये स्मार्टफोन युजर्सना ऑफलाइन नकाशे सेव्ह करण्याची सुविधा मिळते. तुम्ही एखाद्या अशा ठिकाणी असाल जिथे इंटरनेट चालत नाही, किंवा तुमच्या फोनला नेटवर्क नाही, अशावेळी गुगल मॅपचं ऑफलाइन मॅप फीचर तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने गुगल मॅपवर ऑफलाईन नकाशे सेव्ह कर शकता, जे तुम्हाला आपत्कालीन परिस्थितीत मदत करतील.
हेदेखील वाचा- Google Map Update: पैसे वाचवण्यासाठी गुगल मॅप करणार मदत, या फीचरच्या मदतीने गाडी चालवताना होणार इंधनाची बचत
गुगल मॅप्समध्ये युजरच्या सोयीचा विचार करून ऑफलाइन मॅप फीचर सुरू करण्यात आले आहे. या फीचरसह, डिव्हाइस इंटरनेटशी कनेक्ट केलेले नसले तरीही गुगल मॅप वापरता येऊ शकतात. यासाठी तुम्हाला काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागणार आहेत, ज्याच्या मदतीने तुम्ही ऑफलाईन नकाशे सेव्ह करू शकता. (फोटो सौजन्य – pinterest)
गुगल मॅप्स एका खास वैशिष्ट्यासह ऑफलाइन वापरता येतात. यासाठी, प्रथम तुम्हाला इंटरनेट कनेक्शनसह मॅपवर लोकेशन सेव्ह करावे लागेल .
गुगल मॅप ऑफलाइन सेव्ह करण्यासाठी फोनमध्ये स्टोरेज असणे आवश्यक आहे. लोकेशननुसार स्टोरेज लागते. इंटरनेट नसल्यास, ॲपला भेट देताच सेव्ह केलेले लोकेशन पाहिले आणि वापरले जाऊ शकते.
हेदेखील वाचा- Google Map Update: iPhone वर गुगल मॅपला डिफॉल्ट नेविगेशन अॅप बनवायचं? या सोप्या टीप्स तुम्हाला करतील मदत
ऑफलाइन गुगल मॅपसह, तुम्ही रस्त्यांपासून कोणत्याही बेसिक पॉइंटपर्यंत माहिती सेव्ह करू शकता. ऑफलाइन गुगल मॅपसह, वापरकर्त्याला टर्न बाय टर्न नेव्हिगेशनची सुविधा मिळते. डेस्टीनेशनवर जाण्यापूर्वी नकाशा ऑफलाइन सेव्ह केला जाऊ शकतो, जेणेकरून मार्गावर कोणतेही नेटवर्क नसताना तुम्हाला अगदी सहज रस्ता शोधण्यासाठी मदत होऊ शकते.