OnePlus 13 च्या लाँचिंगपूर्वीच स्वस्त झाला हा स्मार्टफोन, कमी किंमतीत मिळणार महागड्या फोनचे फीचर्स
जानेवारी महिन्यात आयोजित केल्या जाणाऱ्या ईव्हेंटमध्ये स्मार्टफोन कंपनी OnePlus त्यांची नवीन स्मार्टफोन सिरीज OnePlus 13 लाँच करणार आहे. याबाबत कंपनीने माहिती देखील दिली आहे. OnePlus 13 जागतिक स्तरावर आणि भारतात 7 जानेवारी 2025 रोजी लाँच होईल. OnePlus 13 च्या लाँचिंगबाबूत चर्चा सुरु असतानाच आता OnePlus 12 च्या किंमती कमी झाल्या आहेत. तुम्हाला OnePlus 12 स्मार्टफोन ऑफर्स आणि डिस्काऊंटसह कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. ई कॉमर्स प्लॅटफॉर्म अॅमेझॉनवर OnePlus 12 च्या खरेदीवर मोठ्या प्रमाणात डिस्काऊंट ऑफर केलं जात आहे.
नवीन वर्षात Nothing करणार मोठा धमाका, लाँच होणार हे नवीन स्मार्टफोन्स! काय असतील स्पेसिफिकेशन्स?
OnePlus 12 हा कंपनीचा जुना फ्लॅगशिप फोन सध्या अॅमेझॉनवर मोठ्या डिस्काउंटसह उपलब्ध आहे. OnePlus 12 जानेवारी 2024 मध्ये लाँच करण्यात आला होता. मात्र आता तुम्हाला हा स्मार्टफोन कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. हा फोन Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसरसह येतो. यात एक आकर्षक 120Hz वक्र AMOLED डिस्प्ले, मोठी बॅटरी, जलद वायर्ड आणि वायरलेस चार्जिंगसह इतर अनेक उत्तम वैशिष्ट्ये आहेत. (फोटो सौजन्य -X)
तुम्ही उत्तम फीचर्स आणि कमी पैशांवाला फ्लॅगशिप स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर OnePlus 12 तुमच्यासाठी बेस्ट आहे. तुम्ही केवळ 52,999 रुपयांत OnePlus 12 स्मार्टफोन खरेदी करू शकता. बँक ऑफर्ससह, फोनवर जबरदस्त डिस्काऊंट देखील ऑफर केलं जात आहे.
OnePlus 12 स्मार्टफोनचे 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज मॉडेल 64,999 रुपयांना लाँच करण्यात आले होते. मात्र आता ऑफर्स आणि डिस्काऊंटसह या फोनची किंमत 59,999 रुपये झाली आहे. तुम्ही अॅमेझॉनवरून OnePlus 12 स्मार्टफोनचे 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज मॉडेल 59,999 रुपयांना खरेदी करू शकता. या स्मार्टफोनचे 16GB रॅम आणि 512GB स्टोरेज मॉडेल 69,999 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आले होते, मात्र आता हा स्मार्टफोन तुम्ही 64,999 रुपयांना खरेदी करू शकता. OnePlus 12 स्मार्टफोनचे दोन्ही व्हेरिअंट अॅमेझॉनवर 5,000 रुपयांच्या फ्लॅट डिस्काउंट ऑफरसह उपलब्ध आहेत.
फ्लॅट डिस्काउंट व्यतिरिक्त, तुमच्याकडे ICICI बँक क्रेडिट कार्ड असल्यास (Amazon Pay क्रेडिट कार्ड वगळता), तुम्हाला चेकआउटच्या वेळी 7,000 रुपयांची फ्लॅट इन्स्टंट बँक सूट देखील मिळेल. यासह, OnePlus 12 च्या 12GB रॅम व्हेरिअंटची किंमत 52,999 रुपये आणि 16GB रॅम व्हेरिअंटची किंमत 57,999 रुपये होईल.
BSNL ने युजर्सना दिलं अनोखं Christmas गिफ्ट! 1 महिना फ्री मिळणार ही सर्विस, काय असणार अट?
तुमच्याकडे ICICI बँक क्रेडिट कार्ड नसेल आणि तरीही तुम्हाला या डीलचा लाभ व्हायचा असेल, तर तुमच्याकडे OneCard क्रेडिट कार्ड असणे आवश्यक आहे. OneCard वापरकर्त्यांसाठी 7,000 रुपयांची बँक सवलत देखील उपलब्ध आहे. एसबीआय आणि इतर बँकांच्या कार्डवरही ग्राहकांना ऑफर दिल्या जात आहेत. मात्र, त्यांची रक्कम कमी आहे. या व्यतिरिक्त, Amazon वर 26,750 रुपयांपर्यंतचे एक्सचेंज डिस्काउंट देखील दिले जात आहे. तथापि, जास्तीत जास्त सवलतीसाठी, फोन चांगल्या स्थितीत असणे आवश्यक आहे.
OnePlus 12 मध्ये स्नॅपड्रॅगन 8 Gen 3 प्रोसेसर, 1290Hz रिफ्रेश रेटसह 6.82-इंचाचा LTPO OLED डिस्प्ले, 5,400mAh बॅटरी, 100W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्ट, 50MP Sony चा LYT-808 प्राथमिक कॅमेरा, 64MP, 4MP, 4MP कॅमेरा आणि 64MP चा टेलिफोन कॅमेरा अशी वैशिष्ट्ये आहेत.