Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 20 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Scam Alert: अरे देवाsss ऑनलाईन पेमेंट केलं, पण सामानाची डिलीव्हरी आलीच नाही! नव्या स्कॅमने उडवली सर्वांचीच झोप; असं राहा सुरक्षित

Online Shopping Scam: सध्या स्मार्टफोन वापरणाऱ्या सर्वच लोकांमध्ये ऑनलाईन शॉपिंगची क्रेझ मोठ्या प्रमाणात आहे. घरबसल्या एखादी वस्तू ऑर्डर करण आता प्रत्येकाला आवडतं. लोकांच्या याच सवयीचा फायदा घेऊन स्कॅमर्स त्यांची फसवणूक करतात. सोशल मीडियावरील आकर्षक ऑफर्स आणि डिलिव्हरी चार्जच्या नावाखाली लोकांकडून पैसे उकळले जातात.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 05, 2026 | 10:45 AM
Scam Alert: अरे देवाsss ऑनलाईन पेमेंट केलं, पण सामानाची डिलीव्हरी आलीच नाही! नव्या स्कॅमने उडवली सर्वांचीच झोप; असं राहा सुरक्षित

Scam Alert: अरे देवाsss ऑनलाईन पेमेंट केलं, पण सामानाची डिलीव्हरी आलीच नाही! नव्या स्कॅमने उडवली सर्वांचीच झोप; असं राहा सुरक्षित

Follow Us
Follow Us:
  • स्कॅमर्स सोशल मीडियावर बनावट ऑफर्स दाखवून ग्राहकांकडून ऑनलाइन पेमेंट करून घेतात.
  • पार्सल डिलिव्हरी आणि ॲड्रेस व्हेरिफिकेशनच्या नावाखाली अतिरिक्त पैसे मागून मोठी फसवणूक केली जाते.
  • अधिकृत ई-कॉमर्स वेबसाइटवरूनच खरेदी करा आणि सोशल मीडियावरील ऑफर्सवर आंधळा विश्वास ठेवू नका.
Scam Updates: देशात सायबर फ्रॉडच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. प्रगत टेक्नोलॉजीचा फायदा घेऊन स्कॅमर्स लोकांची फसवणूक करत आहेत आणि त्यांच्याकडून पैसे उकळत आहेत. स्कॅमर्सनी लोकांची फसवणूक करण्यासाठी अनेक नवीन पद्धती शोधल्या आहेत, आता अशाच एका पद्धतीबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. यामध्ये विविध शॉपिंग चार्जेसच्या नावाखाली यूजर्सकडून पैसे उकळले जातात आणि त्यांचे सामान कधीच डिलीव्हर केलं जात नाही.

पार्टीची रंगत वाढणार! तब्बल 15 तासांच्या बॅटरी बॅकअपसह boAt चे ब्लूटूथ स्पीकर लाँच; किंमत 6 हजारांहून कमी

खरं तर, हल्ली लोकं मार्केटमध्ये किंवा मॉलमध्ये जाऊन खरेदी करण्यापेक्षा ऑनलाईन शॉपिंग करण्याला जास्त प्राधान्य देतात. ऑफर्स आणि डिस्काऊंटसह ऑनलाईन शॉपिंग केल्यास आपल्याला नक्कीच फायदा होईल, असं अनेकांना वाटतं. यामुळे कपड्यांपासून अगदी घरातील भाजीपर्यंत सर्वकाही आता ऑनलाईन ऑर्डर केलं जातं. पण यूजर्सची हीच सवय त्यांच्या फसवणूकीसाठी कारणीभूत ठरू शकते. हा फ्रॉड कसा होतो आणि यामध्ये लोकांची फसवणूक कशी केली जाते, याबाबत आता जाणून घेऊया.  (फोटो सौजन्य: Pinterest) 

सोशल मीडियाद्वारे कशी केली जाते लोकांची फसवणूक?

सोशल मीडिया लोकांची फसवणूक करण्याचे एक माध्यम बनले आहे. अनेकदा सोशल मीडियावर स्कॅमर्स लोकांची फसवणूक करण्यासाठी खोट्या जाहिराती आणि ऑफर्स शेअर करत असतात. अनेकदा सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत लोकांना प्रोडक्ट स्वस्तात मिळण्याचा दावा केला जातो आणि याच ऑफर्स पाहून लोकं भुलतात आणि त्वरित वस्तू ऑर्डर करतात. वस्तू ऑर्डर तर केल्या जातात, पेमेंट देखील होतं पण त्या वस्तू डिलीव्हरचं होत नाही.

डिलीव्हरीवेळी होते फसवणूक

स्कॅमर्स सोशल मीडियावर लोकांना आकर्षित करण्यासाठी खोट्या जाहिराती आणि ऑफर्स शेअर करतात. या ऑफर्स पाहून अनेकजण स्वस्तात वस्तू खरेदी करण्याच्या मोहात ऑर्डर देतात आणि ऑनलाईन पेमेंट देखील करतात. यानंतर यूजर्सना व्हॉट्सॲपवर एक मेसेज पाठवला जातो की, त्यांचे पार्सल पाठवण्यासाठी आधी ॲड्रेस व्हेरिफिकेशनसाठी 1,299 रुपये जमा करावे लागतील. ऑर्डर डिलीव्हर झाल्यानंतर हे पैसे यूजर्सना परत दिले जातील, असा दावा देखील मेसेजमध्ये केला जातो. अनेकदा लोकं यावर विश्वास ठेवतात आणि पेमेंट करतात. अनेकदा विविध चार्जेसच्या नावाखाली लोकांकडून लाखो रुपये उकळले जातात. इथेच सुरु होतो खरा स्कॅम…

Telegram च्या अडचणी वाढल्या! पायरेटेड चित्रपट हटवण्यासाठी सरकारने दिला 15 दिवसांचा अल्टिमेटम

पार्सल डिलीव्हर करण्याच्या नावाखाली अनेकदा लोकांकडून चार्जेस आकारले जातात. दावा केला जातो की, तुमचे पार्सल लवकरच पत्त्यावर पोहोचणार आहे. मात्र हे पार्सल कधी आपल्यापर्यंत पोहोचतच नाही. इंस्टाग्राम रिल्स आणि पोस्ट्समधून हा स्कॅम मोठ्या प्रमाणात घडतो. त्यामुळे ऑनलाईन शॉपिंग करताना नेहमी सावध राहणं अत्यंत गरजेचं आहे.

ऑनलाईन स्कॅमपासून अंस राहा सुरक्षित

  • ऑनलाईन स्कॅमपासून सुरक्षित राहण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे.
  • नेहमी विश्वसनीय ई-कॉमर्स वेबसाईट किंवा ब्रँडच्या अधिकृत वेबसाईटवरून खरेदी करा.
  • सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या ऑफर्सवर विश्वास ठेऊ नका.
  • सेलरची रेटिंग, रिव्यू, रिटर्न पॉलिसी आणि कॉन्टेक्ट डिटेल्स व्यवस्थित तपासा.
  • सहसा कॅश ऑन डिलीवरी पर्याय निवडण्याचा प्रयत्न करा.

Web Title: Online shopping scam alert fraudsters taking fake delivery charges from users to deliver parcel

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 05, 2026 | 10:45 AM

Topics:  

  • cyber scam
  • scam
  • tech updates

संबंधित बातम्या

सरकारची सोशल मीडियावर नजर! पाच महिन्यांत तब्बल 1.95 लाख पोस्ट ब्लॉक करण्याचे आदेश, वाचा सविस्तर
1

सरकारची सोशल मीडियावर नजर! पाच महिन्यांत तब्बल 1.95 लाख पोस्ट ब्लॉक करण्याचे आदेश, वाचा सविस्तर

कधीपर्यंत लाँच होणार BSNL 5G? पुन्हा SIM बदलावे लागणार की सॉफ्टवेअर अपग्रेड मिळणार? जाणून घ्या सविस्तर
2

कधीपर्यंत लाँच होणार BSNL 5G? पुन्हा SIM बदलावे लागणार की सॉफ्टवेअर अपग्रेड मिळणार? जाणून घ्या सविस्तर

Jio यूजर्ससाठी मोठी खुशखबर! कंपनी पुन्हा घेऊन आली Prime Membership… वर्षभरासाठी लॉक करा सध्याचा रिचार्ज प्लॅन
3

Jio यूजर्ससाठी मोठी खुशखबर! कंपनी पुन्हा घेऊन आली Prime Membership… वर्षभरासाठी लॉक करा सध्याचा रिचार्ज प्लॅन

Tech Tips: Cyber Attack झालाय? घाबरू नका! तुमचा डेटा आणि पैसे वाचवण्यासाठी सर्वात आधी करा ‘ही’ महत्त्वाची कामं
4

Tech Tips: Cyber Attack झालाय? घाबरू नका! तुमचा डेटा आणि पैसे वाचवण्यासाठी सर्वात आधी करा ‘ही’ महत्त्वाची कामं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.