Samsung Diwali Offers 2026
HP ZBook Ultra G3a: डिझाइनर्स, इंजिनिअर्स आणि क्रिएटर्ससाठी खुशखबर! HP चा नवा AI लॅपटॉप बाजारात
या फेस्टिव्ह ऑफर्सचा भाग म्हणून निवडक सॅमसंग टीव्ही खरेदी करणाऱ्या ग्राहकांना १,१०,९९० रुपयांपर्यंत मोफत सॅमसंग साउंडबार किंवा १,५९,९९० रुपयांपर्यंत मोफत सॅमसंग व्हिजन एआय टीव्ही मिळू शकतो. या ऑफरमध्ये २० टक्क्यांपर्यंत कॅशबॅक, झिरो डाऊन पेमेंटचे पर्याय आणि ३ वर्षांची सर्वसमावेशक वॉरंटी यांचाही समावेश आहे, ज्यामुळे ग्राहकांना या सणासुदीच्या काळात त्यांचा घरातील मनोरंजनाचा अनुभव अपग्रेड करणे अधिक सुलभ होते. लागू अटी व शर्तींच्या अधीन राहून महानगरपालिका हद्दीतील पात्र सॅमसंग व्हिजन एआय टेलिव्हिजन खरेदी करणारे ग्राहक विनंती नोंदवल्यापासून चार तासांच्या आत त्यांची सॅमसंग उत्पादने इन्स्टॉल करून घेऊ शकतात.
“कुटुंबे आणि मित्रमंडळी एकत्र येऊन दिवाळी सण साजरा करतात, एकत्र उत्साहवर्धक क्षणांचा आनंद घेतात आणि कायमस्वरूपी आठवणी निर्माण करतात. आमच्या व्हिजन एआय-सक्षम मोठ्या स्क्रिन आकाराच्या टीव्हींच्या माध्यमातून सॅमसंग ग्राहकांसाठी अधिक मोठा, स्मार्ट आणि उत्साहवर्धक होम एंटरटेनमेंट अनुभव घेऊन येत आहे. आकर्षक फेस्टिव्ह ऑफर्स, लवचिक पेमेंट पर्याय, कॅशबॅक आणि मूल्यवर्धित सेवांसह आम्ही कुटुंबांसाठी मोठ्या स्क्रिन आकाराचा टीव्ही घरी आणणे आणि या सणासुदीत अधिक समृद्ध मनोरंजनाचा आनंद घेणे अधिक सुलभ करत आहोत,” असे सॅमसंग इंडियाच्या व्हिज्युअल डिस्प्ले बिझनेसचे व्हाइस प्रेसिडेंट विप्लेश डांग म्हणाले.
सॅमसंगचे व्हिजन एआय-सक्षम टीव्ही मोठ्या स्क्रिनवर प्रगत आणि स्मार्ट वैशिष्ट्ये आणतात, ज्यामुळे पिक्चर आणि साऊंडचा दर्जा उंचावण्यास मदत होते, तसेच अधिक वैयक्तिकृत व्ह्यूइंग अनुभव मिळतो. ग्राहक आपले आवडते शोज, चित्रपट, खेळ किंवा सणासुदीचे कार्यक्रम कुटुंबीय आणि मित्रांसोबत पाहत असताना त्यांचा दैनंदिन मनोरंजनाचा अनुभव अधिक उत्साहवर्धक आणि खिळवून ठेवणारा बनवण्यासाठी ही श्रेणी डिझाइन करण्यात आली आहे.
३२ इंचापासून ११५ इंचापर्यंत विस्तृत लाइनअपसह सॅमसंग व्हिजन एआय टीव्ही ग्राहकांच्या विविध गरजा पूर्ण करतात, ज्यामध्ये आकर्षक, जीवनशैलीशी सुसंगत स्लीक डिझाइन्स आणि उत्तम कनेक्टिव्हिटीसाठी स्मार्टथिंग्स सोल्यूशन्सचा समावेश आहे. सॅमसंगचे ‘मेड फॉर इंडिया’ प्लस बेनिफिट्स (सॅमसंग टीव्ही प्लस, सॅमसंग केअर+, सॅमसंग आर्ट+, सॅमसंग साउंड+, सॅमसंग फायनान्स+ आणि ७ वर्षांचे ओएस अपग्रेड) टीव्ही मालकीचा प्रत्येक पैलू समृद्ध होईल याची खात्री देतात.
सॅमसंग टीव्ही प्लस २०० हून अधिक स्ट्रीमिंग चॅनेल्सचा मोफत अॅक्सेस देते, सॅमसंग साउंड+ इमर्सिव्ह साऊंड अनुभव प्रदान करते, सॅमसंग केअर+ वाढीव वॉरंटी देते आणि सॅमसंग फायनान्स+ द्वारे ग्राहकांना लवचिक, पेपरलेस फायनान्सिंग पर्याय मिळतात. सॅमसंग आर्ट+ सह ग्राहकांना सॅमसंग आर्ट स्टोअरचा ३ महिन्यांचा मोफत अॅक्सेस मिळतो, ज्यामुळे त्यांच्या घराचे रूपांतर वैयक्तिक आर्ट गॅलरीमध्ये होते. सॅमसंग व्हिजन एआय टीव्ही खरेदी करणाऱ्या ग्राहकांना सात वर्षांपर्यंतच ओएस अपग्रेड्सचाही लाभ मिळतो, ज्यामुळे दीर्घकालीन मनोरंजन आणि समाधानाची खात्री मिळते.






