Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Samsung च्या लेटेस्ट स्मार्टफोनची भारतात एंंट्री, 5000mAh बॅटरी आणि असे आहेत दमदार फीचर्स; किंमत 25 हजारांहून कमी

Samsung Galaxy A26 5G हा सॅमसंग फोन 24,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लाँच करण्यात आला आहे. हा फोन Super AMOLED डिस्प्ले, इन-होम एक्सिनोस प्रोसेसर, ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह बाजारात लाँच करण्यात आला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 24, 2025 | 01:49 PM
Samsung च्या लेटेस्ट स्मार्टफोनची भारतात एंंट्री, 5000mAh बॅटरी आणि असे आहेत दमदार फीचर्स; किंमत 25 हजारांहून कमी

Samsung च्या लेटेस्ट स्मार्टफोनची भारतात एंंट्री, 5000mAh बॅटरी आणि असे आहेत दमदार फीचर्स; किंमत 25 हजारांहून कमी

Follow Us
Close
Follow Us:

स्मार्टफोन कंपनी सॅमसंगने काही दिवसांपूर्वी त्यांची बजेट फ्रेंडली सिरीज लाँच केली होती. या सिरीजअंतर्गत कंपनीने Galaxy A56, Galaxy A36 आणि Galaxy A26 हे स्मार्टफोन लाँच केले होते. आता या सिरीजमधील Samsung Galaxy A26 5G स्मार्टफोन भारतात देखील लाँच करण्यात आला आहे. Samsung Galaxy A26 5G हा बजेट फ्रेंडली स्मार्टफोन असून कंपनीच्या A-सिरीज लाइनअपचा भाग आहे. या स्मार्टफोनची किंमत 25 हजारांहून कमी आहे. त्यामुळे तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर कंपनीच्या A-सिरीज लाइनअपचा भाग असलेला Samsung Galaxy A26 5G स्मार्टफोन सर्वोत्तम पर्याय असणार आहे.

BSNL ने वाढवलं Jio-Airtel चं टेंशन! 600GB डेटा, 2026 पर्यंत मिळणार व्हॅलिडीटी, इतकी आहे रिचार्ज प्लॅनची किंमत

Samsung Galaxy A26 5G चे फीचर्स

डिस्प्ले

सॅमसंगच्या नवीनतम Galaxy A26 5G स्मार्टफोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.7-इंचाचा FHD+ Super AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेची कमाल ब्राइटनेस 1,000 निट्स आहे, जी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस+ प्रोटेक्शनसह येते. (फोटो सौजन्य – X)

कॅमेरा

या सॅमसंग फोनमध्ये सेल्फी कॅमेऱ्यासाठी U-आकाराचा नॉच आहे. या फोनमध्ये सेल्फीसाठी 13MP फ्रंट कॅमेरा आहे. रियर कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाले तर, यात 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आहे. जे ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन (OIS) ला सपोर्ट करते. यासोबतच, फोनमध्ये 8 मेगापिक्सेलचा अल्ट्रावाइड लेन्स आणि 2 मेगापिक्सेलचा मॅक्रो कॅमेरा आहे. या सॅमसंग फोनमध्ये एक्सिनोस 1380 प्रोसेसर आहे, जो कंपनीने गॅलेक्सी Galaxy A35 स्मार्टफोनमध्ये दिला होता.

रॅम आणि स्टोरेज

हा सॅमसंग फोन 8GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंत स्टोरेजसह लाँच करण्यात आला आहे. यामध्ये मायक्रोएसडी कार्ड स्लॉट देखील देण्यात आला आहे.

बॅटरी

सॅमसंगने या बजेट फोनमध्ये 5000mAh बॅटरीसह 25W फास्ट चार्जिंगसाठी सपोर्ट देखील दिला आहे. हा फोन अँड्रॉइड 15 वर आधारित One UI 7 वर चालतो. कंपनीचे म्हणणे आहे की या फोनला 6 वर्षांसाठी अपडेट्स मिळतील.

फीचर्स

या नव्या फोनमध्ये सॅमसंगचे सर्कल टू सर्च आणि ऑब्जेक्ट इरेजर सारखे एआय फीचर्स देखील उपलब्ध असतील. याला IP67 रेटिंग आहे. इतर वैशिष्ट्यांमध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर, स्टीरिओ स्पीकर्स आणि संपर्करहित पेमेंटसाठी NFC सपोर्ट यांचा समावेश आहे.

‘ही’ कंपनी घेऊन आलीये ‘Gadgets Sale’! जबरदस्त कॅमेरा आणि टॉप क्लास परफॉर्मंस, 15 हजारांहून कमी किंमतीत खरेदी करा हे 5 स्मार्टफोन

सॅमसंग Galaxy A26 5G ची किंमत

Galaxy A26 5G स्मार्टफोन दोन स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. ज्यामध्ये 8GB+128GB आणि 8GB+256GB यांचा समावेश आहे. हा फोन ऑसम ब्लॅक, मिंट, व्हाईट आणि पीच कलर ऑप्शनमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. 8GB+128GB व्हेरिअंटची किंमत 24,999 रुपये आणि 8GB+256GB व्हेरिअंटची किंमत 27,999 रुपये आहे. हा फोन फ्लिपकार्ट, सॅमसंगची अधिकृत वेबसाइट आणि रिटेल स्टोअर्समधून खरेदी करता येईल. लाँच ऑफर्सबद्दल बोलायचे झाले तर, HDFC आणि SBI क्रेडिट कार्डवर 2,000 रुपयांची त्वरित सूट उपलब्ध आहे.

Web Title: Samsung galaxy a26 5g launched in india with powerful battery know about specifications and price

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 24, 2025 | 01:49 PM

Topics:  

  • samsung
  • smartphone
  • Tech News

संबंधित बातम्या

Redmi च्या नव्या बजेट स्मार्टफोनची धमाकेदार एंट्री, 7,000mAh बॅटरी आणि 5G कनेक्टिव्हिटीने सुसज्ज! जाणून घ्या किंमत
1

Redmi च्या नव्या बजेट स्मार्टफोनची धमाकेदार एंट्री, 7,000mAh बॅटरी आणि 5G कनेक्टिव्हिटीने सुसज्ज! जाणून घ्या किंमत

Google Pixel 10 सिरीजच्या लाँचिंगपूर्वी कमी झाली या फोनची किंमत! 20,000 रुपयांच्या डिस्काऊंटसह खरेदी करण्याची संधी
2

Google Pixel 10 सिरीजच्या लाँचिंगपूर्वी कमी झाली या फोनची किंमत! 20,000 रुपयांच्या डिस्काऊंटसह खरेदी करण्याची संधी

Jio युजर्सना झटका! कंपनीने गुपचूप बंद केला हा बजेट-फ्रेंडली प्लॅन, आता दुसरा ऑप्शन कोणता? जाणून घ्या
3

Jio युजर्सना झटका! कंपनीने गुपचूप बंद केला हा बजेट-फ्रेंडली प्लॅन, आता दुसरा ऑप्शन कोणता? जाणून घ्या

Lava Play Ultra 5G: दमदार 5G बजेट स्मार्टफोन लवकरच करणार एंट्री, 64MP कॅमेरासह डेडिकेटेड गेमबूस्ट मोडने सुसज्ज
4

Lava Play Ultra 5G: दमदार 5G बजेट स्मार्टफोन लवकरच करणार एंट्री, 64MP कॅमेरासह डेडिकेटेड गेमबूस्ट मोडने सुसज्ज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.