Smartphone Price Dropped: हीच खरी संधी! हजारो रुपयांच्या डिस्काऊंटसह खरेदी करा Samsung चा प्रीमियम 5G फोन... जाणून घ्या ऑफर्स
WhatsApp Update: चॅट न उघडताच दिसणार ऑनलाइन स्टेटस? लवकरच येणार Instagram सारखे ग्रीन डॉट फीचर…
ई कॉमर्स प्लॅटफॉर्म अॅमेझॉनवर सध्या सॅमसंग गॅलेक्सी एस 25 5G हा 60 हजार रुपयांहून कमी किंमतीत उपलब्ध आहे. कंपनी या स्मार्टफोनच्या खरेदीवर थेट 27 टक्के डिस्काऊंट ऑफर करत आहे. तसेच या स्मार्टफोनवर काही बँक ऑफर्स देखील उपलब्ध आहे, ज्यामुळे किंमत आणखी कमी होणार आहे. त्यामुळे तुम्ही देखील असा एखादा प्रिमियम स्मार्टफोन शोधत असाल ज्याची किंमत 60 हजार रुपयांच्या रेंजमध्ये असेल, तर सॅमसंग गॅलेक्सी एस 25 5G तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो. (फोटो सौजन्य – Pinterest)
खरं तर, प्रिमियम सेगमेंटमधील सॅमसंग गॅलेक्सी एस 25 5G स्मार्टफोन भारतात 77,990 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आला होता. मात्र आता अॅमेझॉनवरून तुम्ही हा प्रिमियम स्मार्टफोन केवळ 56,830 रुपयांच्या किंमतीत खरेदी करू शकता. म्हणजेच तुम्हाला या स्मार्टफोनच्या खरेदीवर थेट 27 टक्के डिस्काऊंट ऑफर केलं जाणार आहे. म्हणजेच सुमारे 20 हजार रुपयांपर्यंत बचत करण्याची संधी मिळणार आहे. तसेच स्मार्टफोनवर काही बँक ऑफर्स देखील उपलब्ध आहे.
एसबीआय क्रेडिट कार्ड ईएमआय पर्यायाचा वापर केल्यास ग्राहकांना 1 हजार रुपयांची सूट मिळणार आहे आणि अॅक्सिस बँक क्रेडिट कार्डसाठी देखील अशीच आहे. ज्यामध्ये ग्राहकांना 1 हजार रुपयांची सूट मिळू शकते. बँक ऑफर्स व्यतिरिक्त या डिव्हाईसवर एक खास एक्सचेंज ऑफर देखील आहे. यामध्ये तुम्ही जुने डिव्हाइस 27,200 रुपयांपर्यंतच्या रकमेसाठी एक्सचेंज करू शकता. मात्र, ही एक्सचेंज रक्कम पूर्णपणे तुमच्या जुन्या फोनच्या स्थितीवर अवलंबून असेल.
Father’s Day 2026: वडिलांसाठी Google ची खास भेट, फादर्स डे निमित्त शेअर केलं अनोखं Doodle
सॅमसंगच्या या प्रिमियम स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 8 एलिट प्रोसेसर देण्यात आला आहे. यासोबतच या डिव्हाईसमध्ये 6.2-इंच 120Hz डायनॅमिक अमोलेड 2X डिस्प्ले आणि एआय-पावर्ड 50MP ट्रिपल-कॅमेरा सिस्टिम देखील आहे. हे प्रिमियम डिव्हाईस अॅडवांस्ड ऑन-डिवाइस जेनरेटिव एडिटिंग, सोपे जेमिनी लाईव्ह इंटीग्रेशन आणि दिर्घकाळापर्यंत मिळणाऱ्या सॉफ्टवेयर सपोर्टमुळे सर्वांचे लक्ष वेधून घेते. या स्मार्टफोनमध्ये 4,000mAh बॅटरी सपोर्ट देण्यात आला आहे.






