फोटो सौजन्य - Social Media
आयटेलने नुकताच भारतात आपला नवीन झेनो १० स्मार्टफोन लाँच केला आहे, जो फक्त ₹५,६९९ पासून उपलब्ध आहे. हा स्मार्टफोन एंट्री-लेव्हल मार्केटमध्ये क्रांती घडवण्याच्या उद्देशाने डिझाइन करण्यात आला आहे. नवीनतम अँड्रॉइड १४, ५००० एमएएच बॅटरी, आणि ऑक्टाकोर प्रोसेसर यासारख्या प्रभावी वैशिष्ट्यांसह झेनो १० ग्राहकांच्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी सज्ज आहे. याला जाणून घेण्यासाठी तसेच या मोबाईलचे बरेच फीचर्स जाणून घेण्यासाठी नक्कीच हा लेख संपूर्ण वाचा. झेनो 10 दोन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. ३ GB RAM तसेच 64 GB स्टोरेज असणारा हा स्मार्टफोन ₹५,६९९ मध्ये मिळत आहे. तर ४ जीबी रॅम + ६४ जीबी स्टोरेज असणारे स्मार्टफोनची किंमत ₹५,९९९ (बँक ऑफरसह) इतकी आहे. आयटेलने केवळ अमेझॉनसोबत भागीदारी केली आहे, त्यामुळे झेनो १० फक्त ऑनलाइन उपलब्ध असेल.
झेनो १० स्मार्टफोनमध्ये ६.५६” एचडी+ डिस्प्ले आहे, जो उत्कृष्ट व्हिज्युअल अनुभव देतो. ८ एमपी रियर कॅमेरा आणि ५ एमपी फ्रंट कॅमेरा असल्यामुळे हा फोन दररोजच्या फोटोग्राफीसाठी योग्य ठरतो. झेनो १०चा डायनॅमिक बार स्टायलिश पॅकेजिंगसह येतो, जो युवा वर्गाला विशेषतः आकर्षित करतो. स्मार्टफोनमध्ये ६४ जीबी इंटरनल स्टोरेज आहे, जे जेन Z ग्राहकांच्या सोशल मीडिया अॅप्स, फोटो, व्हिडिओ आणि अॅप्ससाठी पुरेसे मोठे आहे. याव्यतिरिक्त, ३ जीबी आणि ४ जीबी रॅम व्हेरिएंट्ससह, झेनो १० मल्टीटास्किंगमध्ये गती देतो. ५००० एमएएचची बॅटरी दीर्घकाळ टिकते, ज्यामुळे सतत चार्जिंगची गरज भासत नाही. ऑक्टाकोर प्रोसेसरमुळे फोनची कार्यक्षमता वेगवान असून, वापरकर्ता अनुभव अधिक प्रभावी बनतो.
झेनो १० हा स्मार्टफोन पहिल्यांदा स्मार्टफोन घेणाऱ्यांसाठी, विद्यार्थी आणि बजेटला प्राधान्य देणाऱ्या ग्राहकांसाठी आदर्श आहे. सुरक्षितता, वेगवान परफॉर्मन्स आणि स्टोरेज यांचा योग्य समतोल साधत, झेनो १० हा सर्वोत्तम पर्याय बनतो. नवीन आयटेल झेनो १० हा स्मार्टफोन निवडण्यामागे अनेक कारणे आहेत. सर्वप्रथम, त्याची किंमत खूप परवडणारी आहे, जी ₹६००० च्या आत येते, त्यामुळे बजेटमध्ये स्मार्टफोन खरेदी करणाऱ्यांसाठी हा एक उत्तम पर्याय ठरतो. याशिवाय, झेनो १०मध्ये ६४ जीबीचे मोठे स्टोरेज दिले आहे, जे तुमचे फोटो, व्हिडिओ आणि अॅप्स सहज साठवण्यास सक्षम आहे.
यामध्ये ५००० एमएएचची मोठी बॅटरी आहे, जी दीर्घकाळ टिकते आणि सतत चार्जिंगची आवश्यकता कमी करते. तसेच, ८ एमपी रियर कॅमेरा आणि ५ एमपी फ्रंट कॅमेरासह येणाऱ्या या फोनमध्ये उत्कृष्ट फोटोग्राफीसाठी सर्व आवश्यक वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत. त्यामुळे, आयटेल झेनो १० हा परवडणाऱ्या किंमतीत गुणवत्ता आणि कार्यक्षमता यांचा उत्तम संगम आहे. ₹६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध असलेल्या आयटेल झेनो १० स्मार्टफोनने एंट्री-लेव्हल मार्केटमध्ये एक नवा मानदंड निर्माण केला आहे. किफायतशीर किंमत, आकर्षक वैशिष्ट्ये आणि दर्जेदार कार्यक्षमता यामुळे झेनो १० स्मार्टफोन ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करेल.