(फोटो सौजन्य: Pinterest)
गुगल हे जगातील एक लोकप्रिय सर्च इंजिन आहे. दररोज करोडो लोक त्याचा वापर करतात. कोणत्याही गोष्टीची माहिती मिळवायची असल्यास आपण गुगलचा वापर करू शकतो. इथे इंटरनेटद्वारे माहिती सर्च केली जाते आणि गुगल त्याचे उत्तर तुमच्यासमोर आणून ठेवतो. तुम्हला गुगलवर बरीच विविध प्रकारची माहिती, कंटेंट, फोटो तसेच व्हिडिओ पाहायला मिळतील.
जगभरातील लोक आपल्या रोजच्या जीवनात गुगलचा नियमित वापर करतात. मात्र आज आम्ही तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहोत ती गोष्ट क्वचितच लोकांनी गुगलवर कधी पाहिली असावी. गुगलवर काही शब्ध सर्च केल्यावर स्क्रीनवर काही बदल दिसून येतात. तुमची स्क्रीन शेकिंग देखील त्यापैकी एक आहे. पण, बहुतेकांना याची माहिती नसते. आम्ही तुम्हाला याच शब्दांविषयी माहिती सांगत आहोत. हे शब्द एकदा तरी गुगलवर सर्च करा आणि मजा बघा.
पुन्हा पुन्हा लॅपटॉप चार्ज करून हैराण झालात? या स्मार्ट ट्रिक्सने वाढवता येईल लॅपटॉपची बॅटरी लाइफ
Drop Bear
ड्रॉप बेअर हा असा शब्द आहे की तो गुगलवर सर्च करताच काही मजेदार घडून येते. वास्तविक, गुगलवर हा शब्द शोधल्यास अस्वलाचे चिन्ह स्क्रीनवर दिसू लागते. या आयकॉनवर क्लिक केल्यावर अस्वल खाली पडताना देखील दिसेल. अस्वल पडल्यानंतर स्क्रीन जोरात हलते.
Chixuclub
गुगलवर चिक्सुलब हा शब्द टाइप करून सर्च करताच स्क्रीनच्या वरच्या बाजूला एक मोठा दगड खाली पडताना दिसतो. दगड पडल्यानंतर थोड्याच वेळात स्क्रीन हलू लागेल. जणू काही आकाशातून एक दगड जमिनीवर पडत आहे. दगड खाली पडला की स्क्रीन हलू लागते.
Dart mission
गुगलवर डार्ट मिशन हा शब्द शोधल्याने तुमची स्क्रीन विकृत होईल. गुगलवर डार्ट मिशन हा शब्द टाइप करून सर्च करताच स्क्रीनवर एक उपग्रह डावीकडून उजवीकडे जाताना दिसेल. काही काळानंतर उपग्रह अदृश्य होईल. यांनतर गुगलची स्क्रीन वाकडी होते आणि संपूर्ण दृश्य वाकड्या दिशेने वळल्याचे दिसू लागते.
AI Smartphones: AI फीचर्सने सुसज्ज नववर्षातील तगडे स्मार्टफोन्स; किंमत 20 हजाराहून कमी
Last of us
या यादीतील चौथा शब्द म्हणजे लास्ट ऑफ यू. गुगल वर हा शब्द टाइप करून सर्च केल्यास एक नवीन पेज उघडेल. यानंतर या पेजच्या तळाशी तुम्हाला एक मशरूम दिसेल. या मशरूमवर टॅप केल्याने, बुरशी तुमच्या स्क्रीनवर दिसू लागेल. प्रत्येक वेळी तुम्ही मशरूमवर टॅप कराल तेव्हा ही बुरशी वाढत जाईल.