फोटो सौैजन्य - Social Media
आजच्या पिढीचे ‘योलो’ (“You Only Live Once”) तत्त्व वडिलांना पूर्णपणे समजले नसेलही, पण डिजिटल युगात आर्थिक व्यवहार सुरक्षित ठेवणे ही काळाची गरज आहे. आपल्या वडिलांनीही स्मार्टपणे डिजिटल पेमेंट करावे, यासाठी फादर्स डे निमित्त व्हिसाने काही सोप्या पण प्रभावी टिप्स शेअर केल्या आहेत. या टिप्स प्रत्येक वडिलांना आर्थिक व्यवहार करताना सावध राहायला मदत करतील.
टीएपी (TAP) : ट्रस्ट, अव्हॉइड, प्रोटेक्ट: पेमेंट करताना नेहमी विश्वासार्ह व सत्यापित टर्मिनल्सचाच वापर करावा. सार्वजनिक वाय-फाय नेटवर्क वापरून पेमेंट करणे टाळावे, कारण ते असुरक्षित असू शकते. टू-फॅक्टर ऑथेन्टिकेशन (2FA) वापरून खात्याचे संरक्षण करणे आवश्यक आहे.
एलओसीके (LOCK) : लर्न, ऑब्झर्व्ह, चेक, कीप: सध्या अनेक प्रकारचे सायबर फ्रॉड घडत असतात. त्यामुळे नवीन घोटाळ्यांबद्दल माहिती ठेवा. पेमेंट करताना चुकीचे URL, स्पॅम विनंत्या असलेली साईट्स, अचानक आलेले ऑफर्स याकडे बारकाईने लक्ष द्या. आपल्या व्यवहारांचे अलर्ट्स व्यवस्थित तपासावेत आणि मोबाईल अॅप्समधील कार्ड कंट्रोल्स, पासवर्ड्स आणि ट्रॅव्हल मोड सेटिंग्ज सतर्क ठेवाव्यात.
सीएआरई (CARE) : चेक, ऑथेन्टिकेट, रिव्ह्यू, एन्शुअर प्रायव्हसी: ऑनलाइन खरेदी करताना व्यापारी अधिकृत आहे का? हे बघा. यासाठी वेबसाइटवर ‘https://’ आणि लॉकचा चिन्ह असणे आवश्यक आहे. फिंगरप्रिंट किंवा फेस स्कॅन वापरूनच पेमेंटचे ऑथेन्टिकेशन करा. दर महिन्याला बँक स्टेटमेंट्स तपासून कोणतेही संशयास्पद व्यवहार लक्षात घ्या. कधीही अविश्वसनीय साईटवर आपली कार्ड माहिती सेव्ह करू नका.
अॅक्ट फास्ट : अलर्ट, कॉन्टॅक्ट, टर्मिनेट: जर कोणतीही फसवणूक झाल्याचा संशय आला तर तत्काळ आपल्या बँकेला कळवा. याशिवाय 1930 या सायबर क्राइम हेल्पलाइनवरही संपर्क साधा. तुमचे कार्ड ब्लॉक करा आणि पुढील व्यवहार लगेच थांबवा.
फादर्स डेला फक्त गिफ्ट न देता त्यांना आर्थिक सुरक्षा कशी राखावी हे शिकवा. आज वडिलांनी डिजिटल व्यवहार शिकले, तर उद्या ते आपल्या कुटुंबाचे डिजिटल सुरक्षारक्षक ठरतील. आणि हो, जे वडील “टॅप” करून पेमेंट करतात, त्यांना व्हिसा कडून बोनस पॉइंट्सही मिळणार आहेत!