तुर्कीची आयसिसविरुद्ध मोठी कारवाई (फोटो - सोशल मीडिया)
तुर्की देश आयसिसविरुद्ध आक्रमक
तब्बल 482 संशयितांना घेतले ताब्यात
46 प्रांतात केली मोठी कारवाई
सर्व जग नववर्षाचे स्वागत करण्यासाठी उत्सुक आहे. सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. त्यातच आयसिस ही दहशतवादी संघटना या उत्साहावर पाणी फिरवण्याचा प्रयत्न करण्याच्या तयारीत होती. तुर्की देशाने आयसिसविरुद्ध कडक कारवाई केली आहे. आयसिसविरुद्ध मोहीम तीव्र करण्यात आली आहे. नववर्षाच्या आगमनाच्या वेळेस हल्ल्याचा प्रयत्न उधळून लावण्यात आला आहे. याबाबत तुर्की गृहमंत्रालयाने माहिती दिली.
तुर्की देशाच्या सुरक्षा यंत्रणेने गेल्या 48 तासांमध्ये देशातील 46 भागांमध्ये मोठी कारवाई केली आहे. आज सकाळी केलेल्या कारवाईमध्ये आयसिसच्या 125 संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली. तर काल तब्बल 357 लोकांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणाला मोठे यश प्राप्त झाले आहे.
त्यानुसार गेल्या दोन दिवसांमध्ये 482 संशयित ताब्यात घेण्यात आले आहेत. तुर्कीचा गुप्तचर विभाग, दहशतवाद विरोधी पथक, स्थानिक पोलिस यांनी संयुक्तपणे ही कारवाई राबवली. सोमवारी तुर्कीमधील यालोवा शहरात झालेल्या भीषण हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणेने कडक कारवाई सुरू केली आहे. पुढील काही दिवस ही कडक कारवाई सुरू ठेवली जाण्याची शक्यता आहे. नववर्षाच्या आगमन होण्याआधी तुर्कीत मोठी कारवाई केली गेली आहे.
ISIS चा सर्वनाश! ‘या’ देशाने 108 ठिकाणी थेट घुसून तब्बल…; दहशतवाद्यांची वीतभर फाटली
दहशतवाद्यांची वीतभर फाटली
मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सुरक्षा यंत्रणेने ही कारवाई केली आहे. इस्तंबूलच्या दक्षिण भागात रक्तरंजित कारवाई करण्यात आली आहे. उपलब्ध झालेल्या माहितीनुसार सुरक्षा यंत्रणेने एका गावात एका घरावर छापा टाकला आहे. सुरक्षा पाठक घरात शिरताच दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. त्याला सुरक्षा दलाने देखील जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
दहशतवाद्यांच्या बाबतीत माहिती प्राप्त झाल्यावर सुरक्षा दलाने ही कारवाई केली आहे. काही दहशतवादी गैर मुस्लिम समुदाय आणि देशातील जास्त प्रमाणात असलेल्या गर्दीच्या ठिकाणांना लक्ष्य करण्याची तयारी करत होते. याआधी तुर्की सुरक्षा दलाने थेट 124 ठिकाणी छापे टाकले होते. त्यामध्ये 115 संशयितांना ताब्यात घेण्यात आले होते.
तुर्कीमधील विविध भागातील ISIL शी संबंधित असणाऱ्या 108 ठिकाणी छापेमारी केली आहे. दरम्यान सुरक्षा यंत्रणेने केलेल्या कारवाईत 6 दहशतवादी देखील ठार झाले आहेत. तर सुरक्षा दलांमधील तीन जवानांना प्राण गमवावे लागले आहेत. सुरक्षा यंत्रणेने आयसिसविरुद्ध आपली कारवाई अधिक तीव्र केली आहे.






