Google Doodle Today: गुगलचे नवीन डुडल, होम पेजवर दिसतोय नोव्हेंबर महिन्यातील शेवटचा अर्ध चंद्र
गुगल प्रत्येक विशेष प्रसंगासाठी त्याचे खास डूडल लाँच करत असतो. आता देखील गुगलने एक खास डूडल तयार केलं आहे. हे डूडल नोव्हेंबर महिन्यातील शेवटचा अर्ध चंद्र दाखवत आहे. या डूडलमध्ये युजर्ससाठी एक गेम देखील अॅड करण्यात आला आहे. ज्यामुळे डूडल पाहण्यासोबतच युजर्स गेमचा देखील मजेदार अनुभव घेऊ शकतील. गुगलने आज म्हणजेच 21 नोव्हेंबर रोजी चंद्रावर एक अप्रतिम डूडल तयार केले आहे. हा नोव्हेंबरचा शेवटचा अर्धचंद्र आहे. या चंद्राचे चक्र उद्या शुक्रवारी संपणार आहे. मासिक चंद्र चक्र साजरे करण्यासाठी, गुगलने आपल्या युजर्ससाठी एक मजेदार इंटरॅक्टिव गेम देखील सादर केला आहे.
टेकसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
21 नोव्हेंबरचा गुगल डूडल हा एक इंटरॅक्टिव गेम आहे ज्यामध्ये यूजर्सना चंद्राच्या वेगवेगळ्या टप्प्यांशी जुळवून पौर्णिमा (पूर्ण चंद्र) च्या जोड्या तयार करायच्या आहेत. राइज ऑफ द हाफ मून असं या गेमचं नाव आहे. गेम सुरू करण्यापूर्वी, यूजर्सना नोव्हेंबरच्या अर्ध्या चंद्राच्या टप्प्याबद्दल आणि त्याचे महत्त्व याबद्दल थोडक्यात परिचय देखील मिळेल. नोव्हेंबरचे शेवटचे अर्ध चंद्राचे चक्र उद्या संपेल. चंद्र चक्राबद्दल वापरकर्त्यांमध्ये आवड निर्माण करण्यासाठी, गूगल डूडलने एक इंटरॅक्टिव गेम सादर केला आहे. (फोटो सौजन्य – X)
हा गेम खेळण्यासाठी तुम्हाला गुगलच्या होम पेजवर जावे लागेल. या गेममध्ये, यूजर्सना चंद्राविरुद्ध खेळायचे आहे आणि चंद्र चक्राविषयी त्यांच्या ज्ञानाची चाचणी करायची आहे. गेम सुरू करण्यापूर्वी, यूजर्सना त्याचे नियम आणि उद्दिष्टांबद्दल माहिती दिली जाणार आहे. या गेममध्ये तीन लेवल आहेत.
टेकसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
या गेममध्ये तुम्ही थेट चंद्राला सामोरे जाल! पूर्ण चंद्र तयार करण्यासाठी चंद्राचे टप्पे एकत्र करणे हे तुमचे कार्य आहे. त्यांना योग्यरित्या कनेक्ट करा आणि तुम्हाला त्यासाठी गुण मिळतील. गेममध्ये तीन स्तर आहेत आणि तिन्ही पार करून तुम्हाला विजयी व्हायचे आहे. गुगल डूडलने असेही सांगितलं आहे की विजेत्यांना भेटवस्तू देखील दिली जाऊ शकतात. ते नऊ नवीन बोर्डवर खेळून नोव्हेंबरचे चार नवीन वाइल्डकार्ड देखील अनलॉक करू शकतात.
आज हे गुगल डूडल भारत, अमेरिका, पाकिस्तान, यूकेसह जगातील 20 हून अधिक देशांमध्ये दिसणार आहे. यूजर्स गूगलच्या वेबसाइटवरून डूडल हाफ मून राइजेस वॉलपेपर देखील डाउनलोड करू शकतात. या वॉलपेपरमध्ये तुम्ही तुमच्या स्मार्टफोनसाठी एक मजेदार अनुभव घेऊ शकता.
याआधी हा गेम ऑक्टोबरमध्येही लाँच झाला होता आणि आता तो एका नव्या वर्जनसह लाँच करण्यात आला आहे. हा खेळ सुरुवातीला अगदी सोपा आहे. तुम्हाला चंद्राच्या जोड्या जुळवायच्या आहेत. पण जसजसं तुम्ही पुढे जाणार आणि गेमची लेवल वाढेल तुमच्यासमोर कठीण आव्हाने येतील.