2024 मध्ये लाँच झाले हे फ्लॅगशिप स्मार्टफोन! Apple आणि Oppo चा बोलबाला
2024 मध्ये अनेक स्मार्टफोन कंपन्यांनी त्यांचे प्लॅगशिप स्मार्टफोन लाँच केले. काही फोनची लाँचिंग यशस्वी झाली आणि त्यांना ग्राहकांची सर्वाधिक पसंती मिळाली. पण काही फोन्सला ग्राहकांचा प्रतिसाद मिळाला नाही. काही कंपन्यांनी त्यांच्या आगामी फोनची घोषणा केली आहे. तर काही कंपन्यांनी त्यांचे फोन आधीच लाँच केले आहेत. Apple च्या iPhone 16 सिरीजसह Oppo, Vivo आणि Techno सारख्या कंपन्यानी या वर्षी फ्लॅगशिप स्मार्टफोन लाँच केले आहेत. हा ट्रेंड यापुढेही सुरू राहणार आहे. पण आता अशा स्मार्टफोन्सबद्दल जाणून घेऊया, ज्यांची वर्षभर चर्चा सुरु आहे.
स्मार्टफोनसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा

या वर्षातील सर्वात प्रमुख आणि प्रगत सिरीज म्हणजे iPhone 16. Apple इंटेलिजेंस वैशिष्ट्यांसह सुसज्ज असलेली ही सिरीज Apple ने 9 सप्टेंबर 2024 रोजी जागतिक बाजारात लाँच केली होती. या सिरीजमध्ये आयफोन 16, आयफोन 16 प्लस, आयफोन 16 प्रो आणि आयफोन 16 प्रो मॅक्स या चार मॉडेल्सचा समावेश आहे. भारतात Apple iPhone 16 ची सुरुवातीची किंमत 128GB व्हेरिएंटसाठी 79,990 रुपये आहे. भारतात आयफोन 16 सिरीज लाँच होताच खरेदीसाठी ग्राहकांनी प्रचंड गर्दी केली होती. (फोटो सौजन्य – सोशल मिडीया)

OnePlus 13 स्मार्टफोन जागतिक बाजारपेठेत लाँच झाला आहे आणि आता तो लवकरच भारतातही आणला जात आहे. कंपनी नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस किंवा डिसेंबर महिन्यात OnePlus 13 लाँच करू शकते. स्मार्टफोन स्नॅपड्रॅगन 8 Gen 4 चिपसेटद्वारे समर्थित असेल आणि 6000mAh बॅटरीने सुसज्ज असेल, जी जलद चार्जिंगला सपोर्ट करेल.

Tecno Phantom V Fold 2 आणि V Flip 2 या वर्षी फोल्डेबल सेगमेंटमध्ये लाँच होण्याची अपेक्षा आहे. हे स्मार्टफोन अनुक्रमे MediaTek Dimensity 9000+ आणि MediaTek Dimensity 8020 SoC द्वारे समर्थित असतील. भारतात नवीन फोल्डेबल स्मार्टफोन्सच्या लाँचची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही, परंतु असे म्हटले जात आहे की ते वर्षाच्या अखेरीस लाँच केले जाऊ शकतात.

आगामी फ्लॅगशिप लाइनअपमध्ये Vivo X200, Vivo X200 Plus, आणि Vivo X200 Pro या अनेक मॉडेल्सचा समावेश होण्याची अपेक्षा आहे. गेल्या काही आठवड्यांपासून या सिरीजबाबत चर्चा सुरु आहे. कंपनीने भारतातील लाँचची पुष्टी केली आहे, परंतु लाँचची तारीख अद्याप जाहीर केलेली नाही. यामध्ये मीडियाटेक प्रोसेसर उपलब्ध असेल. 120Hz रिफ्रेश रेटसह एक डिस्प्ले देखील असेल.
टेकसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Oppo ने आपल्या फ्लॅगशिप सीरीज अंतर्गत Find X8 आणि Find X8 Pro स्मार्टफोन भारतात लाँच केले आहेत. फ्लॅगशिप मीडियाटेक डायमेंशन 9400 प्रोसेसर, क्वाड-कॅमेरा सेटअप, अँड्रॉइड 15 आधारित कलरओएस 15 आणि क्विक चार्जिंग बॅटरी यांसारखी वैशिष्ट्ये दोन्ही फोनमध्ये देण्यात आली आहेत. हे फोन ओप्पो ई-स्टोअर, फ्लिपकार्ट आणि रिटेल आउटलेटवर 3 डिसेंबरपासून उपलब्ध होणार आहेत. यावरील प्री-ऑर्डर ग्राहकांसाठी सुरू झाल्या आहेत.






