Gmail Tricks: तुमच्या जिमेलचं स्टोरेज फुल झालंय का? नो टेंशन, या ट्रीक्स करतील मदत
आपण आपल्या अनेक कामांसाठी जिमेलचा वापर करतो. जिमेल प्रोफेशनल आणि पर्सनल अशा दोन्ही कामांसाठी वापरला जातो. आपण आपल्या जिमेल अकाऊंटवरून अनेक ठिकाणी लॉगिन करतो. आणि आपल्याला सतत अनेक मेल येत राहतात. त्यामुळे आपलं जिमेल स्टोरेज लवकर फुल होतं. जिमेल स्टोरेज फुल होणं ही प्रत्येक स्मार्टफोन युजरची समस्या आहे.
टेकसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
आपण आपलं संपूर्ण जिमेल अकाऊंट देखील रिकामं करू शकत नाही. कारण जिमेल आपल्या प्रत्येक कामांसाठी महत्त्वाचं असतं. अशा परिस्थिती काय करावं, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. जिमेल प्रत्येक अकाऊंटसाठी 15 GB विनामूल्य स्टोरेज ऑफर करते. पण स्पॉन्सर्ड ईमेल, मोठ्या फाईल्स आणि स्पॅम मेल यांमुळे आपलं स्टोरेज लवकर फुल होतं. जिमेलचं स्टोरेज फुल झालं की आपल्याला प्रचंड वैताग येतो. अशा परिस्थितीत काय करावं, हे अनेकांना समजत नाही. पण अशा काही सोप्या ट्रीक्स आहेत, ज्यांच्या मदतीने तुम्ही तुमचं फुल झालेलं जिमेल स्टोरेज अगदी काही क्षणातच रिकामं करू शकता. (फोटो सौजन्य – pinterest)
आपण आपलं जिमेल अकाऊंट अनेक ठिकाणी लॉगिन करतो. त्यामुळे आपल्या अकाऊंटला बरेच स्पॅम आणि स्पॉन्सर्ड मेल येत राहतात. या सर्व अनावश्यक मेलमुळे आपलं जिमेल अकाऊंट लगेच फुल होतं. त्यामुळे तुम्ही तुम्हाला नको असलेले अनावश्यक मेल डिलीट करून तुमचं जिमेल अकाऊंट रिकामं करू शकता. यामुळे तुमच्या जिमेल अकाऊंटमध्ये स्पेस वाढेल. तसेच तुमचा जिमेल ॲप सुपरफास्ट होऊ शकतो.
आपल्या जिमेल अकाऊंटमध्ये ट्रॅश आणि स्पॅम फोल्डर दिलेले असतात. आपल्याला अनेक स्पॅम मेल येतात. हे सर्व मेल स्पॅम फोल्डरमध्ये सेव्ह होतात. तर तुम्ही डिलीट केलेल अनावश्यक मेल ट्रॅश फोल्डरमध्ये राहतात. तुम्ही तुमच्या अकाऊंटमधून अनावश्यक मेल डिलीट केले तरी ते ट्रॅश फोल्डरमध्ये सेव्ह राहतात. त्यामुळे अनावश्यक मेल डिलीट करून देखील तुमचं जिमेल अकाऊंट रिकामं होत नाही. त्यामुळे तुमच्या जिमेल अकाऊंटमधील स्पॅम आणि ट्रॅश फोल्डरमधील सर्व मेल डिलीट करा. यामुळे तुमच्या जिमेल अकाऊंटचं स्टोरेज रिकामं होईल.
टेकसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
तुमच्या जिमेल अकाऊंटचं स्टोरेज मॅनेज करण्यासाठी तुम्ही तुम्ही लेबल आणि फोल्डर ऑर्गनाइज करू शकता. तसेच तुम्हाला जे मेल टाळायचे आहेत, त्यांना अनसब्सक्राइब करा. ज्यामुळे तुम्हाला जिमेलमध्ये जास्त स्टोरेज मिळू शकते.
तुम्हाला जिमेलमध्ये Unread मेलचा ऑप्शन दिसेल. इथे तुम्ही न वाचलेले मेल सेव्ह असतील. हे मेल तुम्ही सिलेक्ट करून डिलीट करू शकता. यासाठी सर्वात आधी तुमचं जिमेल अकाऊंट ओपन करा. तुम्हाला ड्रॉप मेनूमध्ये Unread मेलचा ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करा. नको असलेले मेल सिलेक्ट करा आणि डिलीट करा.