Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्मार्टफोनमध्ये होणार मोठा बदल! आता Lithium-ion नाही तर ‘या’ची मिळणार बॅटरी, कधी विचारही केला नसेल…

POCO X7 Pro मध्ये 6000mAh ची बॅटरी मिळत आहे. ही बॅटरी 90W चार्जिंगला सपोर्ट करते. कंपनीने IQoo 13 मध्ये 6000mAh बॅटरी दिली आहे. ही बॅटरी 120W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. OnePlus ने 13 सिरीजमध्ये SiC बॅटरी वापरली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 29, 2025 | 12:02 PM
स्मार्टफोनमध्ये होणार मोठा बदल! आता Lithium-ion नाही तर 'या'ची मिळणार बॅटरी, कधी विचारही केला नसेल...

स्मार्टफोनमध्ये होणार मोठा बदल! आता Lithium-ion नाही तर 'या'ची मिळणार बॅटरी, कधी विचारही केला नसेल...

Follow Us
Follow Us:

2025 हे वर्ष स्मार्टफोनमध्ये मोठी क्रांती घडवणार आहे. यावर्षी स्मार्टफोनमध्ये अनेक मोठे बदल पाहायला मिळणार आहेत. यातील पहिला बदल आता झाला आहे. 2025 मध्ये स्मार्टफोनच्या बॅटरीच्या बाबतीत फार मोठा बदल झाला आहे. आता स्मार्टफोनच्या पारंपारिक लिथियम-आयन बॅटरीचा काळ संपणार आहे. आता लिथियम-आयन बॅटरीची जागा नवीन सिलिकॉन-कार्बन (SiC) बॅटरी घेणार आहेत. अनेक स्मार्टफोन युजर्सनी मागणी केली होती की, स्मार्टफोनमध्ये पारंपारिक लिथियम-आयन बॅटरी ऐवजी नवीन सिलिकॉन-कार्बन (SiC) बॅटरीचा वापर करण्यात यावा. आता अखेर त्यांची ही मागणी पूर्ण होणार आहे.

तुमच्या iPhone मध्ये आधीच TikTok इंस्टॉल आहे? थांबा डिलीट करू नका, मिळवा लाखो रुपये कमवण्याची संधी

नवीन सिलिकॉन-कार्बन बॅटऱ्यांची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांचा आकार फार मोठ्या नसून त्या अधिक शक्तिशाली आहेत. हे सामान्य बॅटरीपेक्षा 12.8% अधिक क्षमता देते. नवीन सिलिकॉन-कार्बन बॅटरी युजर्ससाठी फायद्याची ठरणार आहे. अनेक स्मार्टफोन कंपन्यांनी त्यांच्या फोनमध्ये नवीन सिलिकॉन-कार्बन बॅटरी देण्यास सुरुवात देखील केली आहे. चला तर मग सिलिकॉन-कार्बन बॅटरीसह उपलब्ध असलेल्या स्मार्टफोन्सबद्दल जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)

POCO X7 Pro

POCO ने बजेट फ्रेंडली स्मार्टफोन विभागात आपला ठसा उमटवला आहे. POCO X7 Pro स्मार्टफोनमध्ये यूजरला 6000mAh ची बॅटरी मिळत आहे. ही बॅटरी 90W चार्जिंगला सपोर्ट करते. या फोनची किंमत 29,999 रुपये आहे. या डिव्हाईसचा डिस्प्ले आणि बॅटरी उत्कृष्ट आहे. तुम्ही बजेट फ्रेंडली रेंजमध्ये गेमिंग स्मार्टफोन शोधत असाल तर POCO X7 Pro तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरणार आहे.

iQOO 13

गेमिंग प्रेमींचा आवडता ब्रँड iQOO चा देखील या यादीत समावेश आहे. कंपनीने IQoo 13 मध्ये 6000mAh बॅटरी दिली आहे. ही बॅटरी 120W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. याशिवाय हा डिवाइस स्नॅपड्रॅगन 8 एलिट प्रोसेसरने सुसज्ज आहे. या डिवाइसची किंमत 54,999 रुपये आहे. तसेच, त्याचे वजन 213 ग्रॅम आहे.

OnePlus 13 सिरीज

OnePlus ने आपल्या 13 सिरीजमध्ये SiC बॅटरी वापरली आहे. कंपनीने OnePlus 13 मध्ये 6000mAh ची बॅटरी दिली आहे. ही बॅटरी 100W वायर्ड आणि 50W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते, असा कंपनीचा दावा आहे. यासोबतच हा स्मार्टफोन Snapdragon 8 Elite आणि Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसरसह येतो. OnePlus 13 ची किंमत 69,999 रुपये आणि OnePlus 13R ची किंमत 42,999 रुपये आहे.

JioMart ची खास ऑफर, iPhone 16 खरेदी करण्याची उत्तम संधी! आतापर्यंतचा सर्वात मोठं डिस्काऊंट

Vivo X200 सिरीज

Vivo ने डिसेंबर 2024 मध्ये आपली X200 सीरीज लाँच केली आहे. कंपनीने या स्मार्टफोनमध्ये 5800mAh बॅटरी दिली आहे. तर, कंपनीने Vivo X200 Pro मध्ये 6000mAh बॅटरी दिली आहे. हे फोन सामान्य वापरात 1 दिवसापेक्षा जास्त बॅकअप देतात. या सिरीजची किंमत 60 हजार रुपयांपासून सुरू होते आणि टॉप व्हेरिएंटची किंमत 90 हजार रुपयांपर्यंत जाते. या सिरीजमध्ये वापरकर्त्यांना उत्कृष्ट कॅमेरा सेटअप देखील मिळतो. तथापि, प्रो मॅक्स आणि अल्ट्रा मॉडेल्स सारख्या मोठ्या ब्रँडच्या फ्लॅगशिपमध्ये SiC बॅटरीची प्रतीक्षा आहे. यावर्षी आणखी मोठ्या बॅटरी असलेले स्मार्टफोन येण्याची अपेक्षा आहे.

Web Title: Tech news good news for smartphone users now smartphones will get silicon carbon battery

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 29, 2025 | 12:02 PM

Topics:  

  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

WhatsApp Update: यूजर्सची प्रायव्हसी वाढणार! चॅट ओपन करताच दिसणार नाहीत वैयक्तिक मेसेज… लवकरच येणार Blur Spoiler Tool
1

WhatsApp Update: यूजर्सची प्रायव्हसी वाढणार! चॅट ओपन करताच दिसणार नाहीत वैयक्तिक मेसेज… लवकरच येणार Blur Spoiler Tool

Tech Tips: आकर्षक डिझाईनच्या मागे धावताय? Smartwatch खरेदी करताना तपासा या गोष्टी… अन्यथा होईल पश्चाताप
2

Tech Tips: आकर्षक डिझाईनच्या मागे धावताय? Smartwatch खरेदी करताना तपासा या गोष्टी… अन्यथा होईल पश्चाताप

फोन Reset होताच अकाऊंट झालं रिकामं! एक क्लिक अन् सायबर गुन्हेगारांच्या हाती डिव्हाईसचा अ‍ॅक्सेस… असा घडतोय Scam
3

फोन Reset होताच अकाऊंट झालं रिकामं! एक क्लिक अन् सायबर गुन्हेगारांच्या हाती डिव्हाईसचा अ‍ॅक्सेस… असा घडतोय Scam

गुपचूप स्टोरी पाहण्यापासून ते स्पेशल फॉन्ट्सपर्यंत… Instagram Plus मध्ये यूजर्सना मिळणार हे खास फीचर्स; किंमत केवळ 299 रुपये
4

गुपचूप स्टोरी पाहण्यापासून ते स्पेशल फॉन्ट्सपर्यंत… Instagram Plus मध्ये यूजर्सना मिळणार हे खास फीचर्स; किंमत केवळ 299 रुपये

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.