AI Death Prediction: AI सांगणार मृत्यूची तारीख आणि वेळ? तंत्रज्ञान करणार भविष्यवाणी
तुम्ही AI चा वापर करता का? खरं तर हा प्रश्न हास्यापद आहे. कारण हल्ली आपलं प्रत्येक काम AI वर अवलंबून आहे. AI आपल्याला आपल्या प्रत्येक कामात मदत करतो. AI च्या मदतीने आपला खूप वेळ वाचतो. AI चा शोध लागल्यापासून आपल्या कामाची पध्दत खूप सोपी झाली आहे. शाळेचे प्रोजेक्ट असो किंवा ऑफीसचं काम AI सगळ्यासाठीच फायदेशीर आहे. AI क्षेत्रात दिवसेंदिवस मोठी प्रगती होत आहे. आता AI तुम्हाला तुमच्या मृत्यूची तारीख आणि वेळ देखील सांगणार आहे. याशिवाय तुम्ही निरोगीसाठी राहण्यासाठी काय केलं पाहिजे, कोणत्या गोष्टी खाल्ल्या पाहिजे, हे देखील आता तुम्हाला AI सांगणार आहे.
स्मार्टफोनसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
AI चा हस्तक्षेप प्रत्येक क्षेत्रात झपाट्याने वाढत आहे. हेल्थ केअरपासून फायनान्सपर्यंत सर्वच गोष्टींमध्ये त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. प्रत्येक क्षेत्रात फायदेशीर असणारा हा AI आता भविष्यवाणी देखील करणार आहे. फाइनेंस आणि हेल्थ अंदाजाच्या बाबतीत, त्याची भूमिका खूप वाढली आहे. आजकाल, “डेथ क्लॉक” हे ॲप चर्चेत आहे, जे एखाद्या व्यक्तीच्या रोजच्या सवयींच्या आधारे मृत्यूचे भाकीत करते. (फोटो सौजन्य – pinterest)
हे ॲप यावर्षी जुलैमध्ये लाँच करण्यात आले होते आणि आतापर्यंत जगभरात 1.25 लाख लोकांनी ते डाउनलोड केले आहे. हे ॲप ब्रेंट फ्रॅन्सन यांनी तयार केले होते. मृत्यूची भविष्यवाणी करण्यासाठी हे ॲप ॲडव्हान्स अल्गोरिदम वापरत असल्याचा दावा करण्यात आला आहे. मानवाच्या सध्याच्या सवयी आणि 1200 विश्लेषणांच्या आधारे ते भविष्य वर्तवते. डेथ क्लॉक ॲप 53 दशलक्ष पार्टिसिपंटच्या डेटाबेसच्या आधारे तयार केले गेले आहे.

ॲप एखाद्या व्यक्तीच्या जीवनातील प्रत्येक पैलूवर आधारित भविष्यवाणी करते. यामध्ये आहार, व्यायाम, स्ट्रेस लेव्हल आणि झोपेचा पॅटर्न यासारख्या गोष्टी मोजल्या जातात. पोटेंशियल लाइफ स्पेनसाठी डिझाइन केलेले ॲप जगभरात लोकप्रिय होत आहे. लोक केवळ त्यांच्या मृत्यूची भविष्यवाणी जाणून घेण्यासाठी ॲप डाऊनलोड करत नाहीत तर ॲपद्वारे आपली जीवनशैली सुधारू इच्छिणाऱ्या लोकांची संख्याही मोठी आहे.
हे ॲप एखाद्या व्यक्तीच्या दैनंदिन सवयींवर आधारित पोषण, फिजिकल ॲक्टिविटी आणि स्ट्रेस मॅनेजमेंट सुधारण्यासाठी वैयक्तिक शिफारसी देखील प्रदान करते. याशिवाय, ते फाइनेंस प्लॅनिंगमध्येही महत्त्वाची भूमिका बजावू शकते. याद्वारे, वापरकर्त्यांना भविष्यासाठी आर्थिक योजना तयार करण्यात मदत केली जाऊ शकते.
टेकसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
उदाहरणार्थ, जीवन विमा पॉलिसी आणि पेन्शन योजना अपेक्षित आयुष्यावर आधारित असतात. अशा परिस्थितीत, हे एखाद्या व्यक्तीला अचूक कव्हरेज मिळविण्यात मदत करू शकते. याशिवाय, एखादी व्यक्ती किती वर्षे निरोगी राहू शकते हे ॲप सांगू शकते आणि बचत आणि गुंतवणूक यांच्यातील समतोल साधण्यासाठी अंतर्दृष्टी देखील देऊ शकते. एकंदरीत, डेथ क्लॉक ॲप हे आरोग्य आणि आर्थिक बाबतीत मानवांसाठी एक मौल्यवान संपत्ती असू शकते.






