Google Map Update: गुगल मॅपचे हे फीचर्स तुमच्यासाठी ठरू शकतात डोकेदुखी, वापरण्यापूर्वी विचार करा
जगातील लोकप्रिय टेक कंपनी गुगल अनेकदा नवीन फीचर्सवर काम करत असते. देशात वापरल्या जाणाऱ्या बहुतांश स्मार्टफोनमध्ये गुगलचे अनेक ॲप्स आणि फीचर्स दिलेले आहेत. यातील एक लोकप्रिय गुगल प्लॅटफॉर्म म्हणजे गुगल मॅप. गुगल मॅप गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आहे. याचं कारण म्हणजे गुगल मॅपमुळे आठवडाभरात दोन अपघात झाले आहेत. यातील एका अपघातामध्ये तिघांचा मृत्यू झाला आहे. तर एका अपघतात तीन जण जखमी झाले आहेत. या अपघातानंतर गुगल मॅपनवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या घटनानंतर गुगल मॅपचा वापर करायचा की नाही याबाबत अनेकांना शंका आहे.
गुगल मॅपसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
गुगल मॅप त्यांच्या युजर्ससाठी सतत नवनवीन अपडेट आणि फीचर्स घेऊन येत असतो. कोणताही मार्ग शोधण्यासाठी देशातील बहुतांश लोक गुगल मॅपची मदत घेतात. गुगल मॅप्सचा वापर इतर शहरांमधून येणाऱ्या लोकांना सुरक्षित मार्ग दाखवण्यासाठी केला जातो. अलीकडच्या काळात गुगल मॅपमध्ये अनेक नवीन फिचर्स जोडण्यात आले आहेत. पण यातील काही फीचर्स युजर्ससाठी काहीच कामाचे नाहीत. खरं तर हे फीचर्स युजर्ससाठी डोकेदुखी ठरू शकतात आणि नवीन आव्हाने देखील निर्माण करू शकता. (फोटो सौजन्य – Pinterest)
कोणतीही अज्ञात जागा शोधण्यासाठी गुगल मॅप जितके उपयुक्त आणि फायदेशीर आहेत, तितकेच माय टाइमलाइन फीचर निरुपयोगी आहे. या फीचरमध्ये, गुगल मॅप युजरने भेट दिलेल्या सर्व ठिकाणांची नोंद ठेवली जाते. याचा अर्थ तुम्ही कुठे रोमिंग करत आहात याचा डेटा गुगलकडे आहे. अशा परिस्थितीत या फीचरमुळे अनेकांना आपला डेटा लीक होण्याची भीती आहे. कारण आपण कोणत्या वेळी कोणत्या ठिकाणी आहोत, ही माहिती कोणाकडेही असणं धोकादायक असू शकतं.
गुगल मॅपच्या लोकप्रिय टाइम फीचरमध्ये वापरकर्त्यांना कोणत्या ठिकाणी किती गर्दी आहे याची माहिती मिळते. तसेच, यानुसार, लोक त्यांच्या वेळेची योग्य निवड करू शकतात. मात्र, हे फीचर योग्य माहिती देत नाही, म्हणजेच काहीवेळा गर्दी नसतानाही एखाद्या ठिकाणाची चुकीची माहिती दिली जाते, असा दावा अनेक युजर्सनी केला आहे. अशा परिस्थितीत हे फीचर युजर्सची दिशाभूल करते.
टेकसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
गुगल मॅपच्या निरुपयोगी फीचरमध्ये एक्सप्लोर टॅब फीचरचा देखील समावेश केला जाऊ शकतो. या फीचरच्या मदतीने यूजर्स त्यांच्या आजूबाजूचा परिसर अधिक चांगल्या प्रकारे जाणून घेऊ शकतात. पण कधी कधी हे फीचर तुम्हाला अचूक माहिती देत नाही. तसेच, हे फीचर वापरकर्त्यांच्या वैयक्तिक पसंतीनुसार माहिती शेअर करत नाही, म्हणूनच हे वैशिष्ट्य असणे निरुपयोगी आहे.
गुगल मॅप्सवर बरेच लोक ऑफलाइन मॅप फीचर वापरतात. परंतु या फीचरमध्ये ऑफलाइन नकाशे डाऊनलोड केल्यानंतर जुना डेटा आणि माहिती मिळत असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. अशा परिस्थितीत, इंटरनेट नसताना, या मॅप फीचरवर अवलंबून राहणे खूप धोकादायक ठरू शकते, कारण त्यात नवीन माहिती उपलब्ध नाही. अशावेळी अपघात होण्याची शक्यता अधिक वाढते.