Year Ender 2024: मायक्रोसॉफ्टपासून रेल्वेपर्यंत, हे आहेत 2024 चे मोठे आउटेज! जगावर झाला होता परिणाम
2024 हे वर्ष तंत्रज्ञान क्षेत्रासाठी आंबट आणि गोड आठवणींचे वर्ष होते. यावर्षी जगातील सर्वात वेगवान क्वांटम चिप लाँच करण्यात आली. 2024 मध्ये अनेक नवीन गोष्टी घडल्या. नवीन गॅझेट्स, नवीन तंत्रज्ञान लाँच करण्यात आलं. ज्यामुळे टेक क्षेत्रातील युजर्सचा अनुभव बराच सुधारला. तसेच अनेक नवीन AI चॅटबोट देखील लाँच करण्यात आले. या सर्वासोबतच जगावर आउटेजचा परिणाम देखील झाला.
अनेक मोठ्या कंपन्यांच्या सेवा खंडित झाल्या होत्या. करोडो युजर्स त्रस्त झाले आणि आर्थिक नुकसानही झाले. या आउटेजमुळे जगातील बरीच काम ठप्प झाली होती. आता आम्ही तुम्हाला 2024 मधील 5 सर्वात मोठ्या आउटेजबद्दल सांगणार आहोत, ज्याचा जगावर मोठ्या परिणाम झाला होता. IRCTC सर्व्हर डाऊन, एक्स डाऊन, मायक्रोसॉफ्ट आउटेज, मेटा डाऊन, गुगल आउटेज यांचा 2024 मधील जगातील सर्वात मोठ्या आउटेजमध्ये समावेश आहे. (फोटो सौजन्य – pinterest)
कोणताही मायक्रोसॉफ्ट युजर 19 जुलैचा दिवस विसरू शकत नाही. कारण या दिवशी मायक्रोसॉफ्ट विंडोजची सेवा जवळपास अर्ध्या दिवसासाठी ठप्प झाली होती. मायक्रोसॉफ्ट विंडोज ऑपरेटिंग सिस्टमवरील 8.5 दशलक्ष संगणकांनी अचानक काम करणं बंद केलं होतं. सुरक्षा कंपनी CrowdStrike च्या चुकीच्या अपडेटमुळे हा आउटेज निर्माण झाल्याचं कंपनीने सांगितलं होते. मात्र या आउटेजचा परिणाम जगावर झाला होता.
6,000 हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली होती. ज्यामुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला होता. यासंबंधित अनेक मिम्स देखील व्हायरल झाले होते. शिवाय बँकांची कामं देखील ठप्प झाली होती. ज्या कंपन्यांकडे मायक्रोसॉफ्ट शिवाय इतर कोणताही ऑप्शन नव्हता त्यांच्यावर या आउटेजचा मोठ्या प्रमाणात परिणाम झाला. या सेवा खंडित झाल्यामुळे वापरकर्त्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले आणि कंपन्यांचे आर्थिक नुकसान झाले.
9 डिसेंबर रोजी भारतीय रेल्वेच्या तिकीट बुकिंग प्लॅटफॉर्म IRCTC च्या सर्व्हरमध्ये समस्या आली, ज्यामुळे लाखो प्रवाशांना तिकीट बुक करण्यात अडचणी आल्या होत्या. तिकिटांचे ऑनलाइन बुकिंग, तिकीट रद्द करणे, तात्काळ तिकीट बुकिंग या सर्व सेवांवर परिणाम झाला होता. विशेषत: तत्काळ तिकीट बुक करणाऱ्यांना खूप त्रास सहन करावा लागला.
या वर्षी गुगलच्या अनेक सेवांमध्ये आउटेज दिसून आले. 18 सप्टेंबर रोजी गुगल क्लाउड सेवेत 6 तासांचा खंड पडला होता, तर ऑक्टोबरमध्ये जीमेल सर्व्हरमध्ये 5 तास 45 मिनिटांचा आउटेज होता. ज्याचा युजर्सवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला होता.
एलन मस्कच्या मालकिच्या सोशल मिडीया प्लॅटफॉर्म एक्सची सर्विस 28 ऑगस्ट 2024 रोजी जागतिक स्तरावर डाऊन झाली होती. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आउटेजच्या अनेक तक्रारी नोंदवण्यात आल्या.
POCO C75: POCO चा नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करताय? थांबा, हे अपडेट ठरेल डोकेदुखी
5 मार्च रोजी मोटाची सेवा अचानक डाऊन झाली होती. याचा परिणाम फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सॲप सारख्या सेवांवर झाला. युजर्सना फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सॲप वापरण्यात अडचणी येत होत्या. वापरकर्ते लॉग इन करू शकले नाहीत. हा त्रास तब्बल 4 तास सुरु होता.