Tech Tips: WiFi हॅकिंगचं टेंशन मिटलं! या सोप्या ट्रीक्स वापरून रहा टेंशन फ्री
तुम्ही इंटरनेटचा वापर करता का? खरं तर इंटरनेटशिवाय आपला एकही दिवस जाणं कठीण आहे. कारण आपल्याला आपल्या प्रत्येक कामासाठी इंटरनेटची गरज असते. आपल्या सर्वांकडे स्मार्टफोन आहे. पण त्या स्मार्टफोनमध्ये इंटरनेट कनेक्शन नसेल तर स्मार्टफोन काहीही कामाचा नाही. इंटरनेटशिवाय आपली अनेक कामं रखडू शकतात. इंटरनेटशिवाय आयुष्याची कल्पना करणं देखील कठिण आहे. (फोटो सौजन्य – pinterest)
टेकसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
इंटरनेटचा वाढता वापर पाहता हल्ली अनेकजण त्यांच्या घरी वायफाय कनेक्शन घेतात. वायफाय कनेक्शनमुळे तुम्ही एकाच वेळी अनेक टेक गॅझेट्सचा वापर करू शकता. जसं की स्मार्ट टिव्ही, स्मार्टफोन, लॅपटॉप, कंम्युटर, ॲमेझॉन अलेक्सा, इत्यादी. वायफाय कनेक्शनमुळे आपल्याला कमी पैशांत अनेक सुविधांचा लाभ घेता येतो. त्यामुळे अशावेळी आपलं वायफाय कनेक्शन सुरक्षित असणं गरजेचं आहे.
कारण सध्या अपडेट होत असलेल्या टेक्नोलॉजीमुळे हॅकर्स अगदी सहज कोणातीही गोष्ट हॅक करू शकतात. अशा परिस्थितीत आपणचं आपल्या सुरक्षेची काळजी घेणं गरजेचं आहे. यासाठी आता आम्ही तुम्हाला काही टीप्स सांगणार आहोत, ज्यामुळे तुमचं वायफाय कनेक्शन सुरक्षित राहू शकेल.
तुमच्या वायफाय कनेक्शनसाठी होम नेटवर्कचे डीफॉल्ट नाव आणि पासवर्ड कधीही वापरू नका. कारण यामुळे वायफाय हॅक होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढते. यासाठी तुम्हाला तुमच्या वायफाय कनेक्शनचं नाव बदलणं गरजेचं आहे. वायफाय कनेक्शनचे नाव बदलण्यासाठी, सर्वात आधी Windows कमांड प्रॉम्प्टवर जा, येथे “ipconfig” टाइप करा आणि नंतर इंटरनेट ब्राउझरवर जा आणि तुमचा IP पत्ता शोधा. त्यानंतर तुमच्या राउटरचे लॉगिन क्रेडेंशियल्स फील करा आणि वायफाय सेटिंग्ज ओपन करा. इथे तुम्हाला SSID आणि पासवर्ड बदलण्याचं ऑप्शन दिसेल. इथे तुम्ही तुमच्या वायफासाठी युनिक नाव आणि पासवर्ड सेट करू शकता.
स्मार्टफोनसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
तुमच्या वायफाय कनेक्शनचे क्रेडेन्शियल्स तुम्हाला माहीत नसलेल्या लोकांसोबत शेअर करू नका. कारण अशाप्रकारे तुमच्या वायफायचा पासवर्ड अनेक लोकांपर्यंत जाऊ शकतो. जर तुम्हाला तुमच्या कुटूंबियांव्यतिरिक्त इतर कोणाला तुमच्या वायफायचे डिटेल्स द्यायचे असतील तर त्यासाठी तुम्ही गेस्ट नेटवर्क तयार करू शकता. वायफाय कनेक्शनचे एन्क्रिप्शन चालू ठेवा. यामुळे वायरलेस चॅनल आणि डिव्हाइस दरम्यान शेअर केलेला डेटा एनक्रिप्टेड राहण्यासाठी मदत होणार आहे.
जेव्हा तुम्ही वायफायचा वापर करत नसाल तेव्हा तो बंद करा. यामुळे इतर कोणी तुमच्या वायफाय नेटवर्कमध्ये प्रवेश करू शकणार नाही. तसेच याचा दुसरा फायदा म्हणजे तुमच्या वायफायची स्पीड देखील व्यवस्थित राहील. या सर्व गोष्टींमुळे तुमचं वायफाय कनेक्शन सुरक्षित राहण्यासाठी मदत होणार आहे. आपला बराचं डेटा वायफायसोबत जोडलेला असतो. जर वायफाय हॅक झाला तर हा डेटा हॅकर्सकडे जाऊ शकतो. ज्यामुळे तुमचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे.