क्षणात एडीट करा PDF फाइल! या वेबसाईट करतील तुम्हाला मदत, फ्रीमध्ये होईल काम
हल्ली आपली अनेक कामं डिजीटल पद्धतीने अगदी सहज आणि काही क्षणात पूर्ण होतात. आपल्याला कोणते डॉक्युमेंट पाहिजे असेल तर त्यासाठी आपण कागद शोधत नाही तर आपल्या स्मार्टफोनमध्ये पीडीएफ फाईल शोधतो. आपण आपले अनेक डॉक्युमेंट पीडीएफ फाईलमध्ये सेव्ह केलेले असतात. याशिवाय शाळा, कॉलेज किंवा ऑफीसमधून अनेक फॉर्म्स देखील आपल्याला पीडीएफ स्वरूपात पाठवले जातात. शाळेचे अनेक प्रोजेक्ट्स देखील पीडीएफ स्वरुपात केले जातात.
अनेकदा वेगवेगळ्या कागदपत्रांसाठी आपण पीडीएफ फाईल तयार करतो तर कधी आपल्याला पीडीएफ फाईल एडीट करायची असते. पीडीएफ फाईल तयार करायची प्रोसेस तर अनेकांना माहीत आहे. पण पीडीएफ फाईल एडीट कशी करायची याबाबत अजूनही काहींना शंका आहे. तर आता तुमची ही शंका दूर होणार आहे. आता आम्ही तुम्हाला काही अशा वेबसाईट्सबद्दल सांगणार आहोत, ज्या तुम्हाला पीडीएफ एडीट करण्यासाठी मदत करणार आहेत. (फोटो सौजन्य – istockphoto)
स्मार्टफोनसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
पीडीएफचा फुल फॉर्म ‘पोर्टेबल डॉक्युमेंट फॉरमॅट’ आहे. पीडीएफ फाइल्स ऑनलाइन शेअर आणि रिसिव्ह केल्या जाऊ शकतात. आपल्याला पीडीएफ कशा तयार करायच्या हे तर माहित आहे. पण त्या एडीट कशा करायच्या याबाबत अनेकांना माहिती नाही. तुम्ही काही सोप्या पद्धतीने पीडीएफ एडीट करू शकता. आणि यासाठी अगदी काही क्षणाचा वेळ लागणार आहे. शिवाय पीडीएफ एडीट करण्यासाठी कोणताही खर्च करण्याची गरज नाही. तुम्ही फ्रीमध्ये पीडीएफ एडीट करू शकता. पीडीएफ ऑनलाइन एडीट करण्यासाठी, तुम्हाला काही वेबसाइटची मदत घ्यावी लागेल. जिथे तुमचे काम मोफत केले जाईल.
डॉकफ्लाय वेबसाईटच्या मदतीने तुम्ही अगदी काही क्षणात पीडीएफ एडीट करू शकता. येथे प्रत्येक महिन्याला वापरकर्त्यांना तीन पीडीएफ फाइल्स फ्रीमध्ये एडीट करण्याची सुविधा मिळते. यामध्ये तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कस्टम टेक्स्ट जोडू शकता. बॅकग्राऊंड बदलू शकता. डॉकफ्लाय वेबसाईटवर पीडीएफ एडीट करण्यासाठी तुम्हाला काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागणार आहेत. तुम्हाला फक्त येथे पीडीएफ अपलोड करावी लागेल. तुमच्या गरजेनुसार तुम्ही पीडीएफ एडीट करू शकता.
पीडीएफ एडीट करण्यासाठी सेजदा ही देखील एक वेबसाईट मोफत आहे. येथे पीडीएफचा मजकूर एडिट करता येतो, त्याचप्रमाणे नवीन पीडीएफ फाइलही तयार करता येते. आपण याद्वारे पीडीएफवर स्वाक्षरी देखील करू शकता.
Formswift वेबसाईट युजर्सना मोफत पीडीएफ एडीट करण्याची सुविधा देते. येथे पीडीएफ कोणत्याही अडचणीशिवाय एका क्षणात पीडीएफ एडीट केले जाऊ शकतात. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार बॅकग्राऊंड आणि मजकूर बदलू शकता.
PDFescape ही एक वेबसाइट आहे जी तुम्हाला विनामूल्य पीडीएफ एडीट करण्याची परवानगी देते. येथे एक नवीन पीडीएफ देखील तयार केला जाऊ शकतो. वापरकर्ते पीडीएफमध्ये दुरुस्त्या देखील करू शकतात. एडीट करण्यासाठी, तुम्हाला डॉक्युमेंट येथे अपलोड करावे लागेल आणि तुमच्यासमोर एडीटींगचा पर्याय ओपन होईल.
टेकसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा