व्हॉट्सअॅप कायमचं आपल्या वापरकर्त्यांसाठी नवनवीन फिचर घेवून येत असतो. आता व्हॉट्सअॅप पुन्हा एक भन्नाट नवा अपडेट घेवून आला आहे. हा अपडेट तुमच्या आवाजाशी संबंधीत आहे. म्हणजेचं आता व्हॉट्सअपवर तुमच्या अनेक कॉन्टॅक्ट्सना एकाच वेळी तुम्हाला तुमचा आवाज ऐकवता येणार आहे. तो पण तुमच्या स्टेटसच्या माध्यमातून. आता हल्ली तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअॅप वर चॅटींग, व्हिडीओ कॉल, व्हॉईस कॉल, व्हॉट्सअॅप स्टेटस असे पर्याय उपलब्ध आहेत. पण यांत तुम्हाला प्रत्येक गोष्टीत मर्यादा आहेत. तसेच तुम्हाला तुमचं व्हॉट्सअॅप स्टेटस शेअर करायचं असलं की मग मात्र तुम्ही फक्त टेक्सट, फोटो,व्हिडीओचं तुमच्या स्टेटसला शेअर करु शकता. पण आता तुमचा स्वतचा आवाज देखील तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप स्टेटसवर शेअर करता येणार आहे.
व्हॉट्सअॅप यूजर्सला प्लॅटफॉर्मवर ३० सेकंद पर्यंत व्हाइस स्टेट्स पोस्ट करता येणार आहे. अन्य यूजर्स डाव्या बाजुच्या कोपऱ्यात मायक्रोफोन आयकॉन इंडिकेटर द्वारा या व्हाइस स्टेट्सला पाहू शकतील. ज्याप्रमाणे आपण कुठल्याही सामान्य चॅट किंवा ग्रुपचॅटवर आपम व्हॉईसनोट ऐकतो त्याचप्रमाणे आता तुम्हाला व्हॉट्स अप स्टेटसवर देखील आवाज ऐकता येणार आहे. अतर स्टेटस प्रमाणे हा व्हॉईस स्टेटस देखील तुमच्या कॉन्टॅक्टसला २४ तासांसाठी बघता येणार आहे.