होळी सणाचा आनंद वाढवण्यासाठी घरी बनवा थंडगार पान शॉट्स, गारेगार ड्रिंक पिऊन व्हाल फ्रेश
उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर सगळीकडे कडक ऊन पडते. कामानिमित्त किंवा इतर कोणत्याही कारणांसाठी बाहेर जाऊन आल्यानंतर काहींना काही थंडगार पदार्थ खाण्याची सगळ्यांचं खूप जास्त इच्छा होते. होळी सणाला रंगपंचमी खेळून थकल्यानंतर सगळ्यांचं थंड पदार्थ पिण्याची इच्छा होते. अशावेळी बाहेरून विकतचे कोल्ड्रिंक आणून प्यायले जातात. पण रासायनिक घटकांपासून बनवलेल्या पेयांचे सेवन करण्याऐवजी घरी बनवलेल्या पेयांचे सेवन करावे. यामुळे शरीराला फायदे होतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला वाढत्या उन्हाळ्यात शरीरात थंडावा कायम टिकवून ठेवण्यासाठी थंडगार पान शॉट्स बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हे पान शॉट्स घरातील प्रत्येक व्यक्तीला खूप जास्त आवडेल आणि चव सुद्धा भारी लागेल. रंगपंचमी सणाचा गोडवा आणि ताजेपणा वाढवण्यासाठी घरी बनवलेल्या पेयांचे सेवन करावे. पान शॉट्स बनवताना विड्याचे पान, गुलकंद आणि बडीशेप इत्यादी पदार्थांचा वापर केला जातो. हे पदार्थ चवीसोबतच शरीरासाठी सुद्धा फायदेशीर ठरतात. चला तर जाणून घेऊया पान शॉट्स बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)
Lemon Pickle Recipe: तेलाचा वापर न करता १० मिनिटांमध्ये बनवा रसाळ लिंबाचं लोणचं, कधीच विसणार नाही चव






