‘आता तुम्ही इंटरनेटशिवाय चॅट करू शकणार आहात’, ऐकायला मजेशीर वाटतं असली तरी हे खरं आहे. आतापर्यंत तुम्हाला WhatsApp वापरण्यासाठी इंटरनेटची गरज होती मात्र, तुमच्या फोनवरच नाही तर परिसरात इंटरनेट नसेलही तरी तुम्ही ते वापरू शकणार आहात. WhatsAppने नवीन वर्षाच्या निमित्ताने असं एक नवं फिचर आणलं ज्यामुळे युझर्स इंटरनेटशिवाय देखील ते वापरू शकतील. जाणून घ्या कोणत आहे हे फिचर.
[read_also content=”‘रात्री आठ वाजता बाजार बंद होईल तर कमी मुलं जन्माला येतील’; पाकच्या संरक्षण मंत्र्यांचा जावईशोध, नव्या वादाला फुटलं तोंड https://www.navarashtra.com/latest-news/pakistan-defense-minister-statement-if-the-market-is-closed-at-eight-oclock-in-night-then-few-children-will-be-born-nrps-359602.html”]
युजर्सच्या चांगल्या अनुभवासाठी व्हॉट्स अॅप ॲप सतत नवनवीन फीचर्स जोडत आहे. अॅपने जगभरातील वापरकर्त्यांसाठी प्रॉक्सी सपोर्ट हे फीचर सुरू केलं आहे. व्हॉट्सअॅपने गुरुवारी ही माहिती दिली. प्रॉक्सी सपोर्टच्या मदतीने व्हॉट्सअॅप वापरकर्ते इंटरनेटशिवायही या प्लॅटफॉर्मवर कनेक्ट राहू शकतील. केवळ त्यांच्या फोनवरच नव्हे तर परिसरात इंटरनेट नसले तरीही वापरकर्ते व्हॉट्सअॅप सेवा वापरू शकतील. या फीचरच्या मदतीने व्हॉट्सअॅप वापरकर्ते जगभरातील स्वयंसेवक आणि संस्थांच्या प्रॉक्सी सर्व्हर सेटअपद्वारे कनेक्ट राहण्यास सक्षम असतील.
प्रॉक्सी नेटवर्कशी कनेक्ट असतानाही वापरकर्त्यांना गोपनीयता आणि सुरक्षिततेची काळजी करण्याची गरज नाही, असे सांगितले. त्यांना पूर्वीप्रमाणेच गोपनीयता आणि सुरक्षा मिळत राहील. त्यांचे संदेश एंड-टू-एंड एनक्रिप्टेड असतील. कंपनीच्या म्हणण्यानुसार, यादरम्यान यूजर्सचे मेसेज कोणीही पाहू शकणार नाही. ना प्रॉक्सी नेटवर्कवर, ना मेटा किंवा स्वतः WhatsApp वर. व्हॉट्सअॅपने एका ब्लॉग पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘इंटरनेट बंद कधीच होऊ नये, या 2023 सालासाठी आमच्या शुभेच्छा
We continue to fight for your right to communicate freely and privately.
Now, when connecting to WhatsApp directly is not possible, you can stay connected around the world through a server set up by volunteers and organizations dedicated to helping others communicate freely.
— WhatsApp (@WhatsApp) January 5, 2023
हे फिचर व्हॉट्सअॅपच्या सेटिंग्ज मेनूमध्ये आढळेल. त्यासाठी तुमच्या फोनमधील WhatsApp अपडेटेड असणे आवश्यक आहे. जर तुमच्याकडे इंटरनेटची सुविधा असेल तर तुम्ही सोशल मीडिया किंवा सर्च इंजिनवर विश्वासार्ह प्रॉक्सी नेटवर्क शोधू शकता.
प्रॉक्सी नेटवर्कशी कनेक्ट राहण्यासाठी, तुम्हाला WhatsApp सेटिंग्जमध्ये जावे लागेल. येथे तुम्हाला स्टोरेज आणि डेटाचा पर्याय मिळेल. तुम्हाला प्रॉक्सी या पर्यायावर क्लिक करावे लागेल. आता तुम्हाला Use Proxy च्या पर्यायावर क्लिक करावे लागेल आणि प्रॉक्सी अॅड्रेस टाकून सेव्ह करावे लागेल. अशा प्रकारे तुम्ही हे नेटवर्क वापरण्यास सक्षम असाल. कनेक्शन जुळल्यास तुम्हाला चेकमार्क दिसेल. जर काही कारणास्तव प्रॉक्सी कनेक्शन जोडल्यानंतरही तुम्ही संदेश पाठवू शकत नसाल, तर ते ब्लॉक केले जाण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत, तुम्हाला दुसरे प्रॉक्सी नेटवर्क वापरावे लागेल.