फोटो सौजन्य - सोशल मिडीया
ChatGPT आणि Gemini नंतर आता Meta ने देखील भारतात त्यांचा AI चॅटबॉट लाँच केला आहे. Facebook, WhatsApp, Instagram आणि Messenger वापरकर्ते Meta AI चा मोफत वापर करू शकतात. Facebook, WhatsApp, Instagram आणि Messenger वापरकर्त्यांसाठी Meta AI विनामुल्य उपलब्ध आहे. Meta AI चॅटबोट meta.ai वर देखील उपलब्ध आहे. Meta AI भारतात इंग्रजीमध्ये लाँच करण्यात आले आहे. Meta AI चा वापर कशा प्रकारे करायचा, यासाठी वापरकर्त्यांच्या मनात अनेक शंका आहेत. यासाठी तुम्हाला काही सोप्या टीप्य फॉलो करायच्या आहेत. यानंतर तुम्ही तुमच्या Facebook, WhatsApp, Instagram आणि Messenger वर Meta AI चा वापर करू शकता.
Instagram वर Meta AI चा वापर करण्यासाठी तुम्ही पुढील टीप्स फॉलो करू शकता. सर्व प्रथम तुम्हाला Google Play Store ला जाऊन Instagram अॅप अपडेट करावा लागेल. यानंतर तुमच्या फोनमध्ये Instagram चे लेटेस्ट वर्जन डाऊनलोड होईल. यानंतर Instagram अॅप उघडा आणि त्यातील मॅसेज या सेक्शनमध्ये जा. यानंतर उजव्या बाजूला वरच्या दिशेला दिसणाऱ्या तीन डॉट्सवर टॅप करा. तीन डॉट्सवर टॅप केल्यानंतर तुम्हाला Create An AI Chatbot चा पर्याय उपलब्ध होईल. येथे तुम्हाला Meta AI दिसेल. यानंतर तुम्ही Meta AI सोबत संवाद साधू शकता. Meta AI द्वारे तुम्हाला अनेक प्रश्नांची उत्तरे आणि अनेक विषयांवरील सखोल माहिती मिळण्यास मदत होईल. याच पध्दतीने तुम्ही Facebook, WhatsApp आणि Messenger वर देखील Meta AI चा वापर करू शकता.
WhatsApp वर Meta AI चा वापर करण्यासाठी सर्वप्रथम Google Play Store ला जाऊन WhatsApp अपडेट करावा लागेल. यानंतर तुमच्या फोनमध्ये WhatsApp चे लेटेस्ट वर्जन डाऊनलोड होईल. यानंतर WhatsApp उघडा आणि त्यातील मॅसेज या सेक्शनमध्ये जा. मॅसेज सेक्शनमध्ये तुम्हाला गोल जांभळ्या-निळ्या वर्तुळात एक चिन्ह दिसेल. WhatsApp वर Meta AI चा वापर करण्यासाठी गोल जांभळ्या-निळ्या वर्तुळावर क्लिक करा. यानंतर तुम्ही WhatsApp वर Meta AI सोबत संवाद साधू शकता. Meta AI शोधण्यासाठी सर्चमध्ये जाऊन “@” त्यानंतर “Meta AI” टाइप करा.