स्मार्टफोन हा आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला आहे. आजकाल फक्त कॉलिंग आणि मेसेजिंगसाठीच नव्हे इतर अनेक कामांसाठी स्मार्टफोनचा वापर होत असतो. आजकाल, स्मार्टफोनचा वापर ऑनलाइन पेमेंटसाठी मोठ्या प्रमाणावर केला जातो. बहुतेक लोक ऑनलाइन पेमेंटसाठी UPI वापरतात. एखादी वस्तू ऑनलाईन खरेदी करायची असेल किंवा ऑफलाईन वस्तू खरेदी करायची असेल प्रत्येक कामात UPI पेमेंटची फार मदत होत असते. अशा परिस्थितीत आपला फोन हरवला किंवा चोरीला गेला तर मोठी समस्या निर्माण होऊ शकते.
फोन हरवला किंवा चोरीला गेला की आपल्याला वैयक्तिक आणि बँकिंग तपशील लीक होण्याचा धोका सर्वाधिक असतो. कारण अशावेळेस कोणीही तुमच्या UPI चा गैरवापर करू शकतो. मात्र आता अशी कोणतीही चिंता करण्याची गरज नाही. आता तुमचा फोन हरवला तरी तुम्ही घरी बसल्या त्यातील UPI आयडी सहज डिलीट करू शकता. यासाठीची संपूर्ण प्रक्रिया आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत.
हेदेखील वाचा – अनलिमिटेड कॉलिंग आणि OTT सबस्क्रिप्शनसह Reliance Jio ने लाँच केले 3 नवीन प्लॅन