फोटो सौजन्य - सोशल मिडीया
ChatGPT मेकर OpenAI त्यांच्या AI मॉडेल्सच्या नवीन अपडेटवर काम करत आहे. OpenAI च्या या नवीन प्रोजेक्टला Strawberry प्रोजक्ट असं नाव देण्यात आलं आहे. OpenAI च्या या Strawberry प्रोजक्टची सर्वत्र चर्चा आहे. युजर्सच्या प्रश्नांची उत्तर देण्यासाठी AI मॉडेल्सला अपडेट करणं, हा या प्रकल्पाचा उद्देश आहे. AI मॉडेल्सची विचार करण्याची क्षमता वाढवणं आणि विज्ञान आणि गणिताबद्दल विचारल्या जाणाऱ्या कठीण प्रश्नांची उत्तरं देणं, हा Strawberry प्रोजक्टचा मुख्य उद्देश आहे. हे नवीन अपडेट AI ला इंटरनेटवर स्वतंत्रपणे काम करण्याची क्षमता देखील देईल.
OpenAI चे सीईओ सॅम ऑल्टमन यांच्या नेतृत्वाखाली या प्रकल्पावर काम केले जात आहे. OpenAI चा हा Strawberry प्रोजक्ट एक सिक्रेट प्रोजक्ट म्हणून पाहिला जात आहे. या प्रकल्पाबाबत अधिकृतपणे कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. कंपनीला AI मॉडेल्सना इतके ‘बुद्धिमान’ बनवायचे आहे की ते माणसांसारखे विचार करू शकतील आणि अशा गोष्टी करू शकेल जे सध्याचे मॉडेल करू शकत नाही.
OpenAI ने काही कर्मचाऱ्यांना Strawberry प्रोजक्टचे डेमो दाखवले आहेत, ज्यामध्ये AI मॉडेल्सनी विज्ञान आणि गणिताच्या कठीण प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. सध्या उपलब्ध असणाऱ्या AI मॉडेल्सना अशा कठीण प्रश्नांची उत्तर देणं शक्य नाही. Strawberry प्रोजक्टचा उद्देश आहे की, AI मॉडेल्सना केवळ प्रश्नांची उत्तरे देण्यापुरते मर्यादित न ठेवता त्यांना इंटरनेटवर स्वतंत्रपणे काम करण्याची क्षमता दिली जाईल. Strawberry प्रोजक्टमध्ये एक विशेष प्रकारचे ‘पोस्ट-ट्रेनिंग’ समाविष्ट आहे. यामध्ये आधीच खूप मोठ्या डेटासेटवर तयार करण्यात आलेले AI मॉडेल्स एका विशेष मार्गाने आणखी चांगले बनवले जातील. यामुळे AI मॉडेल्सची क्षमता सुधारेल आणि ते अधिक चांगल्या पध्दतीने कार्य करू शकतील.
Strawberry प्रोजक्ट यशस्वी झाल्यास हे AI तंत्रज्ञानातील एक मोठं यश ठरू शकतं. OpenAI ला Strawberry प्रोजेक्टचा वापर महत्त्वाच्या कामांसाठी करायचा आहे. OpenAI ने सांगितलं आहे की, AI मॉडेल्सने इंटरनेटवर काम करावे आणि ‘कॉम्प्युटर युजिंग एजंट’ (CUA) च्या मदतीने स्वतःहून कृती करावी, यासाठी प्रयत्न सुरु आहेत. OpenAI च्या या Strawberry प्रोजक्टची सर्वत्र चर्चा आहे. युजर्सच्या प्रश्नांची उत्तर देण्यासाठी AI मॉडेल्सला अधिक अपडेट करणं, हा या प्रकल्पाचा उद्देश आहे. AI मॉडेल्सची विचार करण्याची क्षमता वाढवणं आणि विज्ञान आणि गणिताबद्दल विचारल्या जाणाऱ्या अधिक प्रश्नांची उत्तरं देणं, हा Strawberry प्रोजेक्टचा मुख्य उद्देश आहे. हे नवीन अपडेट AI ला इंटरनेटवर स्वतंत्रपणे काम करण्याची क्षमता देखील देईल.OpenAI चे सीईओ सॅम ऑल्टमन यांच्या नेतृत्वाखाली या प्रकल्पावर काम केले जात आहे. OpenAI चा हा Strawberry प्रोजक्ट एक सिक्रेट प्रोजक्ट म्हणून पाहिला जात आहे.