अखेर चर्चा संपली! Lava Shark 5G ने केली एंट्री, किंमत 8 हजार रुपयांहून कमी; वाचा फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
इंडियन स्मार्टफोन कंपनी Lava ने भारतात त्यांचा नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. हा स्मार्टफोन भारतात Lava Shark 5G या नावाने लाँच करण्यात आला आहे. स्मार्टफोन 6nm ऑक्टा-कोर Unisoc T765 चिपसेट आणि 4GB रॅमने सुसज्ज आहे. स्मार्टफोन 4GB वर्चुअल रॅम एक्सपांशनला देखील सपोर्ट करतो. या हँडसेटमध्ये LED फ्लॅशसह 50-मेगापिक्सल डुअल रियर कॅमेरा सेटअप आणि 5-मेगापिक्सल सेल्फी शूटर देण्यात आला आहे.
नुकताच लाँच करण्यात आलेला हा स्मार्टफोन Lava Shark लाइनअपचा 5G व्हेरिअंट आहे. मार्च महिन्यात या स्मार्टफोनचा 4G व्हेरिअंट लाँच करण्यात आला होता. अनेक ग्राहकांनी या स्मार्टफोनसाठी चांगला प्रतिसाद दिला होता. त्यानंतर आता कंपनीने या लाइनअपमधील 5G व्हेरिअंट लाँच केला आहे. या स्मार्टफोनची डिझाईन आयफोनसारखी असल्याची चर्चा आहे. त्यामुळे हा स्मार्टफोन सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. (फोटो सौजन्य – X)
Lava Shark 5G स्मार्टफोन भारतात 4GB + 64GB या व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. स्मार्टफोनच्या या व्हेरिअंटची किंमत 7,999 रुपये आहे. हा फोन स्टेलर ब्लू आणि स्टेलर गोल्ड कलर ऑप्शन्समध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. स्मार्टफोन सध्या ऑफिशियल ई-स्टोर आणि कंपनीच्या रिटेल आउटलेट्सद्वारे विक्रीसाठी उपलब्ध आहे. कंपनीने प्रेस रिलीजमध्ये माहिती दिली आहे की, ग्राहकांना देशभरात Lava रिटेल आउटलेट्सवर सपोर्टसह फ्री एट-होम सर्विसेज मिळणार आहेत.
Introducing Shark 5G: The Killer 5G 🦈⚡
Price: ₹7,999/-Available at your nearest retail outlet and on the Lava E-store!
Shop now! #Shark5G #TheKiller5G #LavaMobiles #ProudlyIndian pic.twitter.com/PLgGHihMAh
— Lava Mobiles (@LavaMobile) May 23, 2025
Lava Shark 5G मध्ये 6.75-इंच HD+ (720×1,600 पिक्सेल) स्क्रीन आहे, ज्यामध्ये 90Hz रिफ्रेश रेट आणि 20:9 आस्पेक्ट रेशियो आहे. हँडसेट 6nm Unisoc T765 प्रोसेसरवर आधारित आहे. ज्याचा AnTuTu स्कोर 4,00,000 हून अधिक आहे.
Lava Shark 5G हा फोन 4GB RAM आणि 64GB ऑनबोर्ड स्टोरेजला सपोर्ट करतो. फोन 4GB वर्चुअल रॅम एक्सपांशन आणि माइक्रोएसडी कार्डद्वारे 1TB पर्यंत एक्सटर्नल स्टोरेजला देखील सपोर्ट करतो. हा स्मार्टफोन Android 15 वर आधारित आहे.
फोटोग्राफीसाठी, Lava Shark 5G मध्ये AI-बॅक्ड 13-मेगापिक्सल डुअल रियर कॅमेरा यूनिट आहे, ज्यामध्ये एक अनस्पेसिफाइड सेकेंडरी सेंसर आणि LED फ्लॅश यूनिट आहे. फोनमध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलसाठी 5-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
Lava Shark 5G मध्ये 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी 18W वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करते.
हँडसेटमध्ये ग्लॉसी रियर पॅनल आणि IP54-रेटेड डस्ट आणि स्प्लॅश-रेसिस्टेंट बिल्ड आहे. सिक्योरिटीसाठी, या स्मार्टफोनमध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. कनेक्टिविटी ऑप्शन्समध्ये 5G, 4G VoLTE, Wi-Fi, Bluetooth 5.0, GPS, GLONASS, USB Type-C पोर्ट आणि 3.5mm ऑडियो जॅक यांचा समावेश आहे.