फोटो सौजन्य - Social Media
पूर्वी ट्विटर नावाने ओळखला जाणारा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X सोमवारी अचानक डाऊन झाला. जगभरातील युजर्सनी मोठ्या प्रमाणावर तक्रारी केल्या, ज्यामुळे सोशल मीडियावर चर्चा रंगली. अनेकांनी आपले प्रॉब्लेम्स शेअर करत X डाऊन झाल्याची माहिती दिली. भारतातून सुमारे 2000 युजर्स, अमेरिकेत 18,000, तर UK मधील 10,000 लोकांनी या समस्येचा सामना करत असल्याचे रिपोर्ट केले. सुरुवातीला काही तक्रारी आल्या, मात्र नंतर त्यांची संख्या झपाट्याने वाढली. जगभरातील युजर्सना X वर लॉगिन करण्यात, पोस्ट करण्यास आणि फीड अपडेट करण्यात अडचणी येत होत्या.
यासंदर्भात X किंवा त्याचे मालक एलोन मस्क यांच्याकडून कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण आलेले नाही. Tesla चे मालक असलेल्या मस्क यांनी ट्विटर खरेदी केल्यानंतर त्याचे X असे नामकरण केले होते. मात्र, या तांत्रिक बिघाडाविषयी कंपनीने कोणतीही माहिती अद्याप दिली नाही आहे. तथापि, काही वेळानंतर X पुन्हा सुरळीत होण्यास सुरुवात झाली असून युजर्सनी त्याचा वापर पूर्ववत सुरू केला आहे. काही तासांचा डाऊनटाइम असला तरी युजर्सनी मोठ्या प्रमाणात तक्रारी केल्या होत्या. सोशल मीडियावर यासंदर्भात जोरदार चर्चा सुरू आहे, आणि युजर्स X कडून अधिकृत स्पष्टीकरणाची वाट पाहत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या वापरकर्त्यांना तांत्रिक समस्यांना सामोरे जावे लागले. यातील 57% युजर्सना अॅपच्या माध्यमातून X वापरताना अडचणी आल्या, तर 34% युजर्सना वेबसाइटच्या माध्यमातून ही समस्या जाणवली. याशिवाय, उर्वरित 9% युजर्सनी इतर तांत्रिक अडचणींची तक्रार नोंदवली आहे. ही समस्या जागतिक स्तरावर असल्याने लाखो युजर्सना X वापरण्यात अडथळा जाणवला. मात्र, कंपनीकडून या तांत्रिक बिघाडाविषयी कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. यामुळे अनेक वापरकर्त्यांमध्ये नाराजी पसरली असून, सोशल मीडियावर यासंदर्भात मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे.