रात्री तुम्हीही स्मार्ट टिव्हीचा प्लग काढत नाही का? तुमची एक चूक पडू शकते भारी! हे नुकसान ऐकून तुम्हीही लावाल डोक्याला हात
जर तुम्ही रिमोटने बंद करत असाल तर तुमचा टिव्ही स्टँडबाय मोडमध्ये असतो. म्हणजेच तुमचा टिव्ही पूर्ण रात्र हळूहळू विजेचा वापर करते. हा विजेचा वापर वाचायला जरी अगदी कमी वाटत असला तरी यामुळे तुमच्या विजेचे बिल वाढू शकते. छोटे टिव्ही देखील स्टँडबाय मोडमध्ये राहिल्यास वर्षभराच्या विजेच्या बिलात शंभर ते दोनशे रुपयांची वाढ होऊ शकते. या पद्धतीने विचार केला तर स्मार्ट टिव्हीमुळे विजेच्या बिलात आणखी वाढ होऊ शकते. (फोटो सौजन्य – Pinterest)
रात्रीच्या वेळी वोल्टेजचा चढउतार देखील स्मार्ट टिव्हीसाठी धोकादायक ठरू शकतो. कारण बहुतेक लोकं टिव्हीसह स्टेबलाइजरचा वापर करत नाही. अशावेळी जर अचानक विज कमी जास्त झाली तर टिव्हीच्या सर्कीटला नुकसान पोहोचू शकते आणि तुमचा टिव्ही लवकर खराब होऊ शकतो. केवळ प्लग सॉकेटमध्ये लावलेला असल्यास अनेकदा इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस खराब होण्याची देखील शक्यता असते. यामुळे जर तुम्ही झोपण्यापूर्वी टिव्हीचा प्लग सॉकेटमधून काढून ठेवला तर तुम्ही दिर्घकाळ तुमच्या टिव्हीचा वापर करू शकता.
सहसा प्रत्येक इलेक्ट्रॉनिक डिव्हाईसचे आयुष्य ठरलेले असते. त्याचप्रमाणे जर तुम्ही टिव्हीचा प्लग सॉकेटमध्ये लावून ठेवला तर त्याला सतत करंट मिळत राहतो आणि यामुळे टिव्हीचे काही भाग हळूहळू खराब होऊ लागतात. स्टँडबाय मोडमध्ये देखील अंतर्गत कंपोनेंट्स अॅक्टिव्ह राहतात, ज्यामुळे टिव्हीचे आयुष्य हळूहळू कमी होऊ लागते. प्लग काढून टाकल्यामुळे टिव्ही पूर्णपणे बंद होते आणि त्याचे आयुष्य वाढते. स्मार्ट टिव्ही वेळोवेळी रिस्टार्ट करण्याची गरज असते, ही प्रक्रिया अगदी स्मार्टफोन रिबूटप्रमाणेच आहे. प्लग काढून टाकल्यास टिव्ही पूर्णपणे शटडाउन होतो, ज्यामुळे कॅशे साफ होतो आणि सॉफ्टवेअर संबंधित छोट्या – मोठ्या समस्या आपोआप सोडवल्या जाऊ शकतात. याचा परिणाम तुमच्या टिव्हीच्या परफॉर्मंसवर अगदी स्पष्टपणे पाहायला मिळतो.
वेळेनुसार टिव्हीच्या स्क्रीनची चमक कमी होऊ लागते. स्टँडबाय मोडमध्ये सतत करंट सुरु असल्याने डिस्प्लेचे पिक्सेल हळूहळू कमजोर होऊ लागतात. जर रात्रभर टीव्ही पूर्णपणे बंद केला तर स्क्रीनची गुणवत्ता जास्त काळ चांगली राहते आणि चित्र पूर्वीसारखेच स्पष्ट दिसते. केवळ रात्री झोपताना टिव्हीचे प्लग काढणं तुमच्यासाठी बरेच फायद्याचे ठरू शकते. यामुळे तुमच्या टिव्हीचे आयुष्य वाढते तसेच चित्राची क्वालिटी देखील चांगली राहते.






