संचार साथीचा चमत्कार! दर मिनिटाला 6 फोन ब्लॉक, तर 2 मिनिटांत 3 फोन्सचा शोध... दूरसंचार विभागाने केला मोठा खुलासा!
दूरसंचार विभागाने जारी केलेला हा अॅप यूजर्सच्या फोनवर येणाऱ्या कोणत्याही स्पॅम आणि खोट्या संभाषणाला रिपोर्ट करण्यासाठी मदत करते. यूजर्स संचार साथी अॅप किंवा वेबसाईटच्या मदतीने फोनवर येणारे कोणतेही खोटे आणि स्पॅम कॉल्स, मेसेज किंवा व्हॉट्सअॅप कम्युनिकेशन रिपोर्ट करू शकणार आहेत. यूजर्सनी अॅपवर रिपोर्ट केल्यानंतर त्याची तपसाणी केली जाणार आहे आणि त्यानंतर जर या तपासणीमध्ये यूजर्सची फसवणूक झाल्याचे आढळल्यास, संचार साथी नंबरसह, वापरलेला हँडसेट म्हणजेच मोबाईल फोन देखील ब्लॉक करतो. (फोटो सौजन्य – Pinterest)
हर मिनट 6 मोबाइल ब्लॉक हो रहे हैं, 4 मोबाइल ट्रेस हो रहे हैं और हर 2 मिनट में 3 मोबाइल रिकवर किए जा रहे हैं। संचार साथी आपके मोबाइल सुरक्षा को तेज, सरल और भरोसेमंद बनाता है ताकि आपका डेटा और आपकी पहचान हमेशा सुरक्षित रहे।#SancharSaathiApp #DoT #Cybersecurity@JM_Scindia… pic.twitter.com/MZ67dHeLSZ — DoT India (@DoT_India) December 12, 2025
एवढंच नाही, संचार साथी अॅपमध्ये हरवलेले मोबाईल फोन रिपोर्ट करण्याची देखील सुविधा आहे. यूजर्स त्यांचे हरवलेले फोनच्या डिटेल्स अॅप किंवा वेबसाईटवर शेअर करून IMEI नंबर ब्लॉक करण्याची विनंती करू शकतात. यूजर्सनी रिपोर्ट केल्यामुळे संचार साथीला हरवलेले फोन शोधण्यासाठी मदत होते. एवढंच नाही, याशिवाय संचार साथी प्लॅटफॉर्मद्वारे तुमच्या नावावर किती सिमकार्ड सुरु आहेत, याबाबत देखील तुम्ही माहिती मिळवू शकता. जर तुम्हाला या ठिकाणी एखादा असा मोबाईल नंबर आढळला जो तुम्ही वापरत नाही, तर तुम्ही हा नंबर ब्लॉक किंवा रिपोर्ट करू शकता.
Huawei Mate X7: फोल्डेबल फोनचा नवा बादशाह? 8-इंच इनर डिस्प्ले आणि लयभारी कॅमेरा! किंमत जाणून घ्या
संचार साथी अॅप खरे आणि खोटे मोबाईल नंबर ओळखण्यासाठी देखील यूजर्सची मदत करतो. या अॅप किंवा वेबसाईटद्वारे हँडसेटच्या IMEI नंबरमधून माहिती मिळू शकते की फोन नंबर खरा आहे की नाही. ओरिजिनल फोन नसेल तर तुम्हाला अलर्ट देखील पाठवला जाणार आहे. अशाप्रकारे, संचार साथी अॅप अनेक कारणांसाठी वापरता येते.






