मुंबईच्या गोरेगाव मध्ये एक संतापजनक घटना घडली आहे. कामाच्या ठिकाणी वेळेवर पोहोचण्यासाठी उबेर टॅक्सी बाईक बुक करणे एका तरुणीला महागात पडले. बाईक चालकाने ड्रॉप केल्यानंतर त्याने तरुणीला अश्लील शिव्या देत मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. हा प्रकार सुरु असतानांच त्या ठिकाणी सतर्क भाजप कार्यकर्त्यांनी मध्यस्थी करून तरुणीला सोडवले. यावेळी उबेर बाईक चालक संधीचा फायदा घेत फरार झाला.
सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेने उचललं टोकाचं पाऊल; गुन्हा दाखल…
नेमकं काय घडलं?
मुंबईच्या गोरेगाव मध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणीने कामाच्या ठिकाणी वेळेवर पोहोचण्यासाठी उबेर टॅक्सी बाईक बुक केली. आणि बाईक चालकाने तिला बाईक चालकाने तरुणीला गोरेगाव पूर्वेकडील आयबी पटेल रोडवर ड्रॉप केले. तिला ड्रॉप केल्यानंतर उबेर बाईक चालकाने तरुणीला अश्लील शिव्या देत मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. हा प्रकार सुर असतानाच त्या ठिकाणी सतर्क भाजप कार्यकर्त्यांनी मध्यस्थी करून तरुणीला सोडवले. यावेळी संधीचा फायदा घेत उबेर बाईक चालक फरार झाला. याप्रकरणी तरुणीने वनराई पोलीस ठाण्यात उबेर बाईक चालकाविरोधात तक्रार केली. तक्रारीनंतर पोलिसांनी त्या उबेर बाईक चालकाला अवघ्या वीस मिनिटात अटक केली आहे. यावेळी अश्या उबेर टॅक्सी चालकांची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासूनच उबेर, ओला, झेप्टो आणि रॅपिडो सारख्या कंपन्यांनी कामावर ठेवले पाहिजे, असे मत गोरेगाव भाजप उपाध्यक्ष संदीप जाधव यांनी वनराई पोलिसांकडे व्यक्त केले आहे.