आष्टी तालुक्यातील शिंदेवाडीच्या महेश बापू दरेकर यांनी तीन एकरात पाच महिन्यांपूर्वी कांदा लागवड केली होती.आज कांदा शेतात काढून ठेवला आणि कांदा मार्कट मध्ये न्यायचा पण गेल्या सहा दिवसांपासून सुरु असलेल्या अवकाळी पावसाने महेश दरेकरांच्या स्वप्नाचा सत्यानाश केला. बाजारात जायची वाट पहात शेतात पडून असलेला तब्बल 300 गोणी कांदा अक्षरशः वाहून गेला आहे.शेताच्या माती सोबत कांद्याचाही चिखल झाला.. भर पावसात दरेकर कुटूंब कांदा वाचवण्यासाठी धडपडतायत आणि त्यांच्या सोबत त्यांची सहा वर्षाची चिमुरडी प्रगती आपल्या चिमुकल्या हातात कांदा गोळा करत आहे.