मावळ तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. हा पाऊस शेतकऱ्यांच्या शेतीसाठी महत्वाचा असला तरी दुसरीकडे उन्हाळी बाजरीचे पिके या पावसाने हिरावून नेली आहेत. मावळ मधील दारूंब्रे गावातील शेतकरी सुरेश वाघोले यांच्या डोळ्यात पाणी आले आहे. हातातोंडाशी आलेलं बाजरीचं पिकं अवकाळी पावसामुळे जमीनदोस्त झाले असून घरपरिवार कसा चालवायचा असा प्रश्न या शेतकऱ्या समोर पडला आहे. बाजरी पिकांचे पंचनामा करून नुकसानभरपाई देण्याची मागणी बळीराजाने कृषी खात्याला केली आहे. परंतु प्रत्यक्षात पंचनामा करण्यासाठी येणारे सहाय्यक कृषी अधिकारीच संपावर असल्याने शेतकऱ्यांनी न्याय कोणाकडे मागायचा हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.