पोलीस कर्मचाऱ्यांना मिळाले हक्काचे घर! कोपरगावात ६४ सदनिकांच्या वसाहतीचे उद्घाटन
कोपरगाव तालुका पोलिस स्टेशन व ६४ पोलीस कर्मचारी वसाहत इमारतीचे आणि फॉरेन्सिक व्हॅनचे लोकार्पण जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते आ. आशुतोष काळे यांच्या उपस्थितीत मंगळवार दि. ३ रोजी पोलीस स्टेशन परिसरात उत्साहात पार पडले, त्यावेळी आशुतोष काळे बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, नव्या इमारतीचे लोकार्पण करताना आणि पोलीस कर्मचाऱ्यांना सदनाच्या चाव्या देताना मनस्वी आनंद होत आहे. पूर्वी कोपरगाव शहर व कोपरगाव तालुका असे एकच पोलिस स्टेशन होते. यामुळे पोलिस कर्मचाऱ्यांवर अधिकचा ताण पडत होता. यावर कायमचा तोडगा निघावा म्हणून माजी आ. अशोकराव काळे यांनी २०१३ साली तत्कालीन गृहमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या मार्फत शहर व ग्रामीण असे दोन वेगवेगळी पोलिस स्टेशन तयार केली.
यावेळी पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती, प्रांताधिकारी माणिक आहेर, तालुका पौलीस स्टेशनचे निरीक्षक संदीप कोळी, शहर पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, माजी आ. स्नेहलताताई कोल्हे, राजेश आबा परजणे, राजेंद्र जाधव, नगराध्यक्ष पराग संधान, नितीन औताडे, काकासाहेब कोयटे, काळे कारखाना व्हाईस चेअरमन प्रवीण शिंदे कोल्हे कारखाना देअरमन ज्ञानेश्वर परजणे, संभाजी काळे, विश्वासराव महाले, अरुण येवले आदीसह पोलीस अधिकारी संख्येने नागरिक उपस्थित होते.
तालुका पोलीस स्टेशन इमारत आणि पोलीस कर्मचारी वसाहती व्हावी यासाठी तालुक्यामध्ये अजूनही कायदा सुव्यवस्थेचा आणि अवैध धंद्यांचा प्रश्न शिल्लक आहे. यावर पोलिस प्रशासन आणि इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी अधिक ताकतीने काम करावे.
पोलिस प्रशासनाचे पाठबळ इतर विभागाला मिळाले तर त्यांची काम करण्याची उर्जा वाढते. यामुळे पोलिस प्रशासनाने जबादारीने काम करून तालुक्यात कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवावी.
कोपरगाव तालुक्याचे प्रशासकीय कामकाज विना अडथळा चालण्यासाठी कोपरगाव कोर्ट, उप जिल्हा रुग्णालय व पोलीस स्टेशन व कर्मचारी वसाहत इमारत उभी राहण्यासाठी अजितदादा पवार, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे सहकार्य लाभले आहे.






