पैशांच्या वादातून मित्राने केली हत्या
अमरावती : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न यांसारखे गुन्हे घडताना दिसत आहे. असे असताना अमरावतीत दारूमुळे बापाने आपल्याच मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. स्वतःला आणलेली दारू मुलाने प्यायल्याने वडिलांनी पोटच्या मुलाला झोपेतच मारहाण करत हत्या केली.
मुलाच्या हत्येप्रकरणी नराधम हिरामण धुर्वे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी त्याला अटकही केली आहे. अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील बहादा गावातील ही धक्कादायक घटना आहे. या घटनेने गावात खळबळ उडाली आहे. वडील आणि मुलगा दोघेही दारूच्या आहारी गेले होते. रोज दारू पिऊन घरी यायचे. शिवाय घरी देखील दारूच्या बाटल्या आणून रात्री दारू प्यायचे. त्यानुसार, हिरामण धुर्वे याने स्वतःसाठी घरी दारू आणली होती. घरामध्ये असलेली दारूची बाटली मुलाचा नजरेस पडली.
हेदेखील वाचा : Crime News : हरवलेली मुलगी, बॅगेत मृतदेह अन् २४०० किमी प्रवास…; असं उलगडलं अंगावर शहारे आणणाऱ्या खूनाचं गूढ
दरम्यान, दारूची नशा असल्याने वडिलांनी स्वतःसाठी आणलेली दारू मुलाने पिऊन घेतली. यानंतर तो घरातच झोपून गेला होता. काही वेळानंतर घरी आलेल्या वडिलांना दारूची बाटली दिसली नाही. तर ती दारू पिऊन मुलगा झोपला असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर हिरामण याने आणलेली दारू मुलाने प्यायल्याने दोघांमध्ये वाद झाला.
वादाचे रूपांतर हाणामारीमध्ये
दारू पिण्यावरून मुलगा व वडील यांच्यामध्ये वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीमध्ये झाले. तर झोपेत असलेल्या ३२ वर्षीय मुलावर पित्याने काठीने वार केले. यामध्ये जबर दुखापत होऊन मुलाचा मृत्यू झाला. घटनेची माहिती समजताच गावात खळबळ उडाली. तर पोलिसांना घटनेची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येत पंचनामा केला.
नाशिकमध्येही एकाची हत्या
दुसऱ्या एका घटनेत, नाशिक शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. आता पुन्हा एक हत्या झाल्याने नाशिक हादरले आहे. नाशिक शहरातील पंचवटी परिसरातील पेठ रोडवरील फुलेनगर येथील गौडवाडी परिसरात काल (१ जून) मध्यरात्रीच्या सुमारास खून झाल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पंचवटी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सुरु आहे.
हेदेखील वाचा : Crime News: आधी मृतदेह पुरला, त्यावर टाकलं १०० किलो मीठ, तरीही आरोपींची निर्दोष मुक्तता; नेमकं प्रकरण काय?