शिरुरमध्ये झोपलेल्या कुटुंबाला सत्तूरच्या धाकाने लुटले (File Photo : Crime)
अमरावती : अमरावतीच्या व्यंकय्यापुरा येथील कुख्यात गुंड ऋषिकेश उमेश मोडक उर्फ गोंडी याच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांनी वार करून हत्या केली. ही घटना मंगळवारी (दि.4) घडली. या घटनेमुळे पुन्हा एकदा शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, हत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
अभिषेक मोडक हा कुख्यात गुन्हेगार आहे. त्याच्या कारवाया पाहून पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी दीड वर्षांपूर्वी त्याच्यावर एमपीडीएअंतर्गत कारवाई केली होती. दोन महिन्यांपूर्वीच तो तुरुंगातून बाहेर आल्याची माहिती आहे. कुख्यात अभिषेक आणि त्याचा अन्य साथीदार दुचाकीवरून वडाळीकडे जात होते. याचवेळी हल्लेखोरांनी दिव्य सदन केंद्राजवळ धारदार शस्त्रांनी त्यांच्यावर हल्ला केला. यात डोक्याला जबर मार लागल्याने अभिषेक खाली पडला. त्यानंतर गोंडीचा मित्र जीव वाचवण्यासाठी तेथून पळून गेला. यादरम्यान आरोपींनी गोंडीला मारहाण सुरूच ठेवली. काही वेळाने सर्व आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.
हेदेखील वाचा : Santosh Deshmukh Case : धाराशिवमधील भूम शहरात आज बंद; धनंजय मुंडेंबाबत केली ‘ही’ मोठी मागणी
दरम्यान, फ्रेजरपुरा पोलिसांना घटनेची माहिती मिळताच एक पथक घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला असून, गोंडीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला. या घटनेतील हल्लेखोर अद्याप सापडलेले नाहीत. सध्या फ्रेजरपुरा पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत. दरम्यान, मागील 48 तासातील हत्येची ही दुसरी घटना आहे.
आंतरजातीय विवाहातून केली हत्या
तर दुसऱ्या घटनेत, सात महिन्यांपूर्वी आंतरजातीय विवाह करून सुखी संसाराची स्वप्न रंगवणाऱ्या एका कुटुंबाचा दुर्दैवी शेवट झाल्याची घटना काही दिवसांपूर्वीच घडली. ही धक्कादायक घटना नांदगाव पेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. पत्नीची गळा आवळून हत्या केल्यानंतर पतीने स्वतः सुद्धा आत्महत्या करून जीवन संपवले.