मुंबई : येथील महात्मा गांधी पुतळा परिसरात काँग्रेसच्या (Mumbai Congress protests) वरिष्ठ नेत्यांचे केंद्र सरकार विरोधात सुरू आहे. केंद्रीय यंत्रणेचा चूकीचा वापर करत मानसिक छळ करण्याचा प्रयत्न मोदी सरकारचा सुरू आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या मागे ईडीचा ससेमिरा लावत राजकीय सूडबुध्दीने आजारपणातही त्यांना लावलेल्या चौकशी सामोरे जावे लागत आहे. असा आरोप यावेळी करण्यात आला.
काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी (sonia gandhi) यांची ईडीकडून दुसऱ्यांदा चौकशी केली जात आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये संतापाची लाट पसरली आहे. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी देशभरात निदर्शने सुरू केली आहे. आकसातून ही कारवाई केली जात असल्याचा आरोप या आंदोलकांनी केला आहे. सोनिया गांधींविरोधातील ईडी चौकशीच्या निषेधार्थ काँग्रेसच्या (congress) कार्यकर्त्यांनी मुंबईतील महात्मा गांधी पुतळा परिसरात धरणे आंदोलन सुरू केलं आहे. या आंदोलनाला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री अशोक चव्हाण, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, व इतर आमदार खासदार आंदोलनात उपस्थित होते. या आंदोलनामध्ये काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येना सामील झाले होते. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी इडी विरोधात जोरदार घोषणाबाजी ही केली.
[read_also content=”राहुल गांधींनी साधला पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा, म्हणाले…. https://www.navarashtra.com/india/rahul-gandhi-reaction-after-ed-action-on-him-nrsr-308265.html”]
तिकडे दिल्लीतही काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आलं. काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यासह अनेक नेते या धरणे आंदोलनात सहभागी झाले होते. त्यानंतर राहुल गांधी यांनी संसद ते राष्ट्रपती भवनापर्यंत पायी मार्च काढण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी या सर्वांवर कारवाई केली आहे. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते संतप्त झाले असून त्यांनी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली आहे.
[read_also content=”ग्रामपंचायतीच्या अनागोंदी कारभाराबाबत पिंपळेश्वर संघटना आक्रमक ; सुधारणा न झाल्यास आंदोलनाचा इशारा https://www.navarashtra.com/maharashtra/pimpaleshwar-organization-is-aggressive-about-the-chaotic-administration-of-gram-panchayat-nrab-308312.html”]