कराड : रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथील कृष्णा सहकारी बँकेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली. बँकेचे चेअरमन डॉ. अतुल भोसले (Dr. Atul Bhosale) यांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळ निवडणुकीसाठी एका जागेसाठी एकच अर्ज दाखल झाल्याने जिल्हा उपनिबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी संदीप जाधव बँकेची निवडणूक बिनविरोध झाल्याचे घोषित केले.
य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि डॉ. अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या कृष्णा सहकारी बँकेला कृष्णाकाठची अर्थवाहिनी म्हणून ओळखले जाते. सुवर्णमहोत्सवी वर्षे पूर्ण केलेल्या या बँकेच्या सन २०२२-२३ ते २०२६-२७ या पंचवार्षिक कालावधीसाठी संचालक मंडळासाठीची निवडणूक प्रक्रिया नुकतीच बिनविरोध पार पडली. जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.
या निवडीबद्दल कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी सर्व नवनिर्वाचित संचालक मंडळाचे अभिनंदन केले आहे. तसेच सभासदांनी दाखविलेल्या विश्वासाबद्दल नूतन संचालक मंडळाने सर्व सभासदांचे आभार मानले आहेत.
नवनिर्वाचित बिनविरोध संचालक मंडळ
डॉ. अतुल सुरेशराव भोसले (रेठरे बुद्रुक), शिवाजी मुरारजी पाटील (बहे), शिवाजीराव बाबुराव थोरात (कालवडे), दामाजी महादेव मोरे (रेठरे हरणाक्ष), हर्षवर्धन मोहनराव मोहिते (बेलवडे बुद्रुक), प्रमोद मारुती पाटील (वाठार), प्रकाश बापूसो पाटील (आटके), गिरीश बाबुलाल शहा (कराड), रणजीत बाळासो लाड (शिरटे), प्रदीप राजाराम थोरात (नरसिंहपूर), नामदेव खाशेराव कदम (पेठ), विजय निवासराव जगताप (वडगाव हवेली), सरिता सर्जेराव निकम (शेरे), सरिता महादेव पवार (कराड), अनिल विष्णू बनसोडे (खुबी), संतोष दत्तात्रय पाटील (कासारशिरंबे), नारायण भीमराव शिंगाडे (शेणोली)