महायुती सरकारच्या मंत्र्यांची आणि आमदारांची कारकीर्द सध्या विविध कारणांमुळे चर्चेत येत आहे. आता काँग्रेसचे नांदेड लोकसभेचे खासदार रवींद्र चव्हाण यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर थेट अधिवेशनादरम्यान रमी खेळल्याप्रकरणी जोरदार टीका केली आहे. चव्हाणांच्या मते, शेतकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देण्याऐवजी जर मंत्री रमी खेळत असतील, तर हे अत्यंत निंदनीय आहे. यातून सरकारला जनतेची, विशेषतः शेतकऱ्यांची, काळजी नसल्याचे दिसून येते, असा आरोपही त्यांनी केला आहे. आमदारांकडून कर्मचाऱ्यांना मारहाण, अधिवेशनातच हाणामारी असे प्रकार घडत असताना, हे सरकार लोकांचे केवळ ‘एंटरटेनमेंट’ करत असल्याचे चित्र आहे, असं चव्हाण यांनी म्हटलं आहे.