मोठी बातमी! महाराष्ट्र भूषण अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर
नुकतंच देशातील महत्वाचे मानाचे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. उद्या २६ जानेवारी आहे, अर्थात अवघ्या देशभरात प्रजासत्ताक दिन अगदी जल्लोषात साजरा केला जाणार आहे. त्याच्या पुर्वसंध्येलाच पद्म, पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. मराठी चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय अभिनेते अशोक सराफ यांना अभिनय क्षेत्रातील पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. शिवाय स्वर्गीय राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना मरणोत्तर पद्मभुषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
भारत सरकारने आज पद्म पुरस्कार २०२५ ची घोषणा केली. राष्ट्रपतींनी १३९ पद्म पुरस्कारांना मंजुरी दिली आहे. यामध्ये एक जोडी देखील समाविष्ट आहे. या यादीत ७ पद्मविभूषण, १९ पद्मभूषण आणि ११३ पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. पुरस्कार विजेत्यांमध्ये २३ महिलांचा समावेश आहे. या यादीत १० परदेशी आणि १३ मरणोत्तर पुरस्कार विजेत्यांचाही समावेश आहे. डॉ. नीरजा भाटला, भीम सिंग भावेश, पी. दत्तामूर्ती आणि एल. हँगथिंग यांना पद्मश्री प्रदान करण्यात येणार आहे. डॉ. नीरजा भाटला या दिल्ली येथील स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत. ती गर्भाशयाच्या ग्रीवेच्या कर्करोगाचे निदान, प्रतिबंध आणि उपचार यात विशेषज्ञ आहे. या कामासाठी त्यांना पद्मश्री मिळत आहे.
काय आहेत पद्म पुरस्कार
हा देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक आहे. हे पुरस्कार पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री अशा तीन श्रेणींमध्ये दिले जातात. कला, समाजसेवा, सार्वजनिक कार्य, विज्ञान आणि अभियांत्रिकी, व्यवसाय आणि उद्योग, औषध, साहित्य आणि शिक्षण, क्रीडा, नागरी सेवा इत्यादी विविध क्षेत्रात हे पुरस्कार दिले जातात. ‘पद्मविभूषण’ हा अपवादात्मक आणि विशिष्ट सेवेसाठी दिला जातो, ‘पद्मभूषण’ हा उच्च दर्जाच्या विशिष्ट सेवेसाठी दिला जातो आणि ‘पद्मश्री’ हा कोणत्याही क्षेत्रातील विशिष्ट सेवेसाठी दिला जातो. दरवर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त हे पुरस्कार जाहीर केले जातात.
पद्मविभूषण यादी
१. श्री दुव्वूर नागेश्वर रेड्डी (औषध, तेलंगणा)
२. न्यायमूर्ती (निवृत्त) श्री जगदीश सिंह खेहर (सार्वजनिक व्यवहार, चंदीगड)
३. श्रीमती कुमुदिनी रजनीकांत लाखिया (कला, गुजरात)
४. श्री लक्ष्मीनारायण सुब्रमण्यम (कला, कर्नाटक)
५. श्री एम.टी. वासुदेवन नायर (मरणोत्तर) (साहित्य आणि शिक्षण, केरळ)
६. श्री. ओसामु सुझुकी (मरणोत्तर) (व्यापार आणि उद्योग मंत्री, जपान)
७. श्रीमती शारदा सिन्हा (मरणोत्तर) (कला, बिहार)
पद्मभूषण यादी
१. श्री ए सूर्य प्रकाश (साहित्य आणि शिक्षण-पत्रकारिता, कर्नाटक)
२. श्री अनंत नाग (कला, कर्नाटक)
३. श्री बिबेक देबरॉय (मरणोत्तर) (साहित्य आणि शिक्षण, राष्ट्रीय राजधानी क्षेत्र, दिल्ली)
४. श्री जतिन गोस्वामी (काला, आसाम)
५. श्री जोस चाको पेरियापुरम (औषध, केरळ)
६. श्री कैलाशनाथ दीक्षित (इतर-पुरातत्व, राष्ट्रीय राजधानी क्षेत्र, दिल्ली)
७. श्री मनोहर जोशी (मरणोत्तर) (सार्वजनिक बांधकाम, महाराष्ट्र)
८. श्री नल्ली कुप्पुस्वामी चेट्टी (व्यापार आणि उद्योग, तामिळनाडू)
९. श्री नंदमुरी बालकृष्ण (कला, आंध्र प्रदेश)
१०. श्री पी.आर. श्रीजेश (क्रीडा, केरळ)
११. श्री पंकज पटेल (व्यापार आणि उद्योग, गुजरात)
१२. श्री पंकज उधास (मरणोत्तर) (कला, महाराष्ट्र)
१३. श्री राम बहादूर राय (साहित्य आणि शिक्षण-पत्रकारिता, उत्तर प्रदेश)
१४. साध्वी ऋतंभरा (समाजसेवा, उत्तर प्रदेश)
१५. श्री. एस. अजित कुमार (कला, तामिळनाडू)
१६. श्री शेखर कपूर (कला, महाराष्ट्र)
१७. सुश्री शोभना चंद्रकुमार (कला, तामिळनाडू)
१८. श्री सुशील कुमार मोदी (मरणोत्तर) (सार्वजनिक बांधकाम, बिहार)
१९. श्री. विनोद धाम (विज्ञान आणि अभियांत्रिकी, अमेरिका)
पहा जाहीर झालेली यादी
Padma Awards 2025 | Unsung and unique Padma Awardees. Full list to be released shortly. Dr Neerja Bhatla, a Gynaecologist from Delhi with specialized focus on cervical cancer detection, prevention and management being awarded Padma Shri. Bhim Singh Bhavesh, social worker from… pic.twitter.com/tIkPS8Pzln — ANI (@ANI) January 25, 2025
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून कौतुक
‘देशातील सर्व पद्म पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन ! महाराष्ट्रातील पद्म पुरस्कार विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व सलाम! आपल्या कार्यक्षेत्रातील आपले योगदान हे महाराष्ट्रातील जनतेसाठी प्रेरणादायी ठरेल. महाराष्ट्रातील प्रत्येकाला तुमच्या यशाबद्दल अभिमान वाटतो’ अशा शब्दात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांचे अभिनंदन केले आहे.