'महाराष्ट्राची हास्यजत्रा' आता लंडनमध्ये लाईव्ह पाहता येणार, तिकीट कधी अन् कुठे बुक करायचं?
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ने अवघ्या महाराष्ट्राचं निखळ मनोरंजन केलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा शो बंद आहे. सध्या शोतील कलाकार परदेश दौरा करीत आहे. शोप्रमाणेच कलाकारांचीही प्रेक्षकांमध्ये क्रेझ पाहायला मिळत आहे. खरंतर, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ची क्रेझ महाराष्ट्रापुरतीच राहिली नाही, परदेशातील प्रेक्षकांमध्ये शोची क्रेझ आहे. येत्या काही दिवसांत परदेशातल्या मराठी प्रेक्षकांना ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ शो लंडनमध्येही लाईव्ह पाहायला मिळणार आहे. अभिनेता समीर चौघुलेने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत परदेशातल्या चाहत्यांनाही मोठी ‘गुड न्यूज’ दिली आहे.
काही तासांपूर्वीच समीर चौघुलेने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट शेअर करत ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रम थेट लंडनमध्ये पाहता येणार, अशी माहिती देण्यात आली आहे. समीर चौघुलेने शेअर केलेल्या पोस्टवरून लंडनमध्ये हा कार्यक्रम लाईव्ह पाहता येणार, असे समजत आहे. येत्या २३ नोव्हेंबर आणि २४ नोव्हेंबरला लंडनमध्ये होणार आहे. या युके टुर दरम्यान, २३ नोव्हेंबरला पहिला शो होणार आहे. हा, संध्याकाळी ५ वाजता बेक थिएटरमध्ये २३ नोव्हेंबरला पहिला शो होणार आहे. तर दुसरा शो २४ नोव्हेंबरला होणार आहे. दुपारी १: ३० वाजता शॉ थिएटर, सेंट्रल लंडनमध्ये दुसरा शो संपन्न होणार आहे.
अभिनेता समीर चौघुलेने तिकिट बुकिंगसाठी पोस्टमध्ये चाहत्यांना लिंकही दिलेली आहे. लिमिटेड सीट्स असल्याने लवकरात लवकर आपले तिकिट बुक करावे, अशी विनंती अभिनेत्याने प्रेक्षकांना केली आहे. समीर चौघुलेने शेअर केलेल्या पोस्टरमध्ये, त्यांच्याबरोबर नम्रता संभेराव, प्रभाकर मोरे, चेतना भट आणि प्रथमेश शिवलकर या कलाकारांचेही फोटो दिसत आहेत. आता लंडनमध्येही या कलाकारांच्या निखळ मनोरंजनाने परदेशातील मराठी प्रेक्षकांना पोटदुखेपर्यंत हसता येणार एवढं नक्की. लंडनमध्ये होणाऱ्या शोमध्ये ‘महाराष्ट्राच्या हास्यजत्रे’तील आणखी कोणते कलाकार असणार आहेत त्याची माहिती अद्याप समजलेली नाही.
ए आर रहमानच्या घटस्फोटावर मुली खतिजा आणि रहीमा यांच्या समोर आल्या प्रतिक्रिया, म्हणाल्या…
येत्या २ डिसेंबरपासून ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चा नवा सीझन सुरू होणार आहे. शुटिंगला गेल्या काही दिवसांपूर्वीच सुरूवात झाली असून शोचे नवनवे प्रोमो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.