Namrata Sambherao Shared A Post For Samir Choughule On His Birthday
मराठी इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांना ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून प्रसिद्धी मिळाली आहे. आपल्या विनोदी शैलीच्या माध्यमातून आणि दमदार अभिनय कौशल्याच्या जोरावर सर्वच कलाकारांनी आपली ओळख प्रस्थापित केली आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ मधील लोकप्रिय कलाकारांपैकी एक असलेल्या अभिनेता समीर चौघुले सध्या चर्चेत आला आहे. आज अभिनेत्याचा वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याची सहकलाकार आणि त्याची खास मैत्रिण नम्रता संभेराव हिने खास पोस्ट शेअर करत अभिनेत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
‘अलग हूं पर कमजोर नहीं…’, तगडी स्टारकास्ट असलेला अनुपम खेर यांचा ‘Tanvi The Great’ चा ट्रेलर रिलीज
नम्रताने समीरसोबतचा एक फोटो शेअर करत, त्याला खास पद्धतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. नम्रताने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामध्ये समीर चौघुलेसोबत अनेकदा भन्नाट विनोदी स्किट सादर केले आहेत. शिवाय, अनेकदा मुलाखतींमधून समीरचं तिने कौतुकही केलं आहे. त्याच्याकडून खूप काही शिकायला मिळाल्याचंही तिने सांगितलं आहे.
शेअर केलेल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये, नम्रताने समीरला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना कॅप्शनमध्ये लिहिलंय की, “सॅम (दादा) वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा… तुझ्यासारखा दुसरा कोणीही नाही… तुला प्रत्यक्ष काम करताना पहाणं आणि तुझ्यासोबत काम करणं निव्वळ सुख आहे. मी सदैव तुझी फार मोठी फॅन आहे. संपूर्ण जगात तुझ्या नावाचा डंका वाजतोय, आम्हाला खूप अभिमान वाटतो तुझा. तू आयुष्यभर असाच उत्साही राहा… आमची प्रेरणा आहेस तू…”
नम्रताने शेअर केलेल्या पोस्टवर समीरने “खूप प्रेम” अशी कमेंट केली आहे. शिवाय या नम्रताच्या पोस्टवर समीरच्या अनेक चाहत्यांनी कमेंट करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, समीर चौघुलेंच्या कामाबद्दल बोलायचं तर, अभिनेता शेवटचा ‘गुलकंद’ चित्रपटातून चाहत्यांच्या भेटीला आला होता. अनेक शोमध्ये आणि चित्रपटांमध्ये सहाय्यक कलाकाराची भूमिका साकरल्यानंतर अभिनेत्याने या चित्रपटामध्ये मुख्य भूमिका
साकारली.
समीर चौघुले कायमच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामध्ये आपली विनोदी भूमिका साकारत प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसत असतात. समीर यांनी आपला अचूक टायमिंग आणि विनोद बुद्धी यांमुळे प्रेक्षकांची मनं जिंकले आहे.