सोनम वांगचूक यांना अटक (फोटो- सोशल मिडिया)
लेहमध्ये सुरू आहे हिंसाचार
लडाखला संपूर्ण राज्याचा दर्ज देण्याची मागणी
सोनम वांगचूक यांना अटक
Sonam Wangchuk Arrest: लडाख या केंद्रशासित प्रदेशाला पूर्ण राज्याचा दर्जा आणि सहाव्या अनुसूचीमध्ये समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या निषेधाला बुधवारी हिंसक वळण लागले. हिंसाचारात चार जणांना आपले प्राण गमवावे लागले. आज या प्रकरणात प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. या आंदोलनात उपोषण करणाऱ्या पर्यावरणवादी सोनम वांगचूक यांना अटक करण्यात आली आहे.
लडाखमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर पर्यावरणवादी सोनम वांगचूक यांना अटक करण्यात आली आहे. लेह हिंसाचार प्रकरणात सोनम वांगचूक यांना अटक करण्यात आली आहे. लडाखला संपूर्ण राज्याचा दर्जा देण्यात यावा यासाठी अंदळण केले जात होते. सोनम वांगचूक हे उपोषण करत होते.
लडाखला संपूर्ण राज्याचा दर्जा मिळावा यासाठी आंदोलन सुरू होते. यामध्ये आंदोलकांनी भाजपचे कार्यालय देखील पेटवले होते. सीआरपीएफची वाहने देखील पेटवण्यात आली होती. त्यानंतर पोलिसानी तेथे कडक भूमिका घेत सोनम वांगचूक यांना अटक केली आहे. या हिंसाचारात अनेक जण जखमी झाले आहेत.
लेहमध्ये हिंसाचार वाढल्याने सोनम वांगचूक यांना आपले उपोषण मध्येच सोडावे लागले आहे. या ठिकाणी झालेल्या हिंसाचारावर देखील वांगचूक यांनी भाष्य केले होते.
आंदोलनात मृत्युमुखी पडलेले चार जण कोण?
लेहमध्ये तणावाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक पोलीस आणि निमलष्करी दलाने गुरूवारीपासून जमावबंदी आदेश लागू केले. तसेच एकूण ५० जणांना अटक केली. कारगिलसह इतर प्रमुख शहरांमध्ये पाच किंवा त्याहून अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास बंदी घालणारे कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मृतांपैकी दोघे जण रुग्णालयात पोहोचले तेव्हा जिवंत होते परंतु नंतर त्यांचा मृत्यू झाला. त्यांना त्यांच्या शरीरावर आणि डोक्यावर अनेक गोळ्या लागल्या होत्या. सुमारे अर्धा डझन जणांना गंभीर गोळ्या लागल्या होत्या पण ते वाचले. इतरांचे हातपाय तुटले होते आणि ते बरे होत आहेत. बहुतेकांना गोळ्या आणि काठ्यांनी दुखापत झाली होती आणि उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले. लडाखचे उपराज्यपाल कविंदर गुप्ता यांनी याला सुनियोजित कट रचला असल्याचे म्हटले. या सर्वांमध्ये, वांगचुक म्हणाले की या संपूर्ण प्रकरणात त्यांना बळीचा बकरा बनवले जात आहे.