पाणी प्यायल्यानंतर लगेच लघवीला जावे लागते? जाणून घ्या वारंवार लघवीला होण्याची कारणे आणि त्यावरील उपाय
वारंवार लघवीला का जाण्याची सवय योग्य की अयोग्य?
लघवीमध्ये अडथळे का निर्माण करतात?
पाणी प्यायल्यानंतर सतत लघवीला का होते?
अन्न, पाणी, निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत. नियमित पाणी पिणे आवश्यक आहे. दिवसभरात ३ ते ४ लिटरपेक्षा जास्त पाणी प्यावे. पाणी प्यायल्यामुळे शरीर हायड्रेट राहते आणि शरीराला भरमसाट फायदे होतात. पाणी प्यायल्यानंतर लघवीवाटे शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जातात. पण काहींना पाणी प्यायल्यानंतर लगेच १० ते १५ मिनिटांमध्ये लगेच लघवीला जावे लागते. पण सतत तुम्हाला पाणी प्यायल्यानंतर लघवीला जावे लागत असेल तर ही सवय शरीरासाठी धोक्याची ठरते. अनेक लोक सामान्य समस्या समजून दुर्लक्ष करतात. पण दुर्लक्ष न करावं वेळीच उपचार करणे आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला पाणी प्यायल्यानंतर लगेच लघवीला का जावे लागते? यामागे नेमकी काय आहेत कारण आणि उपचार याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – istock)
एक ग्लास किंवा त्यापेक्षा जास्त पाणी प्यायल्यानंतर लगेच लघवीला जाण्याची काहींना सवय असते. ही समस्या ओव्हर अॅक्टिव्ह ब्लॅडरमुळे उद्भवते. मूत्राशयाच्या स्नायूंमध्ये गरजेपेक्षा जास्त वेळा आकुंचन पावण्याची क्रिया झाल्यानंतर मूत्राशय पूर्ण भरलेला नसतानाही वारंवार लघवी वारंवार लघवीला जावेसे वाटते. याशिवाय काहींना या समस्येमुळे लघवी करताना वेदना होणे किंवा जळजळ वाढते. त्यामुळे कायमच तुम्हाला पाणी प्यायल्यानंतर लघवीला जाण्याची सवय असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते उपचार करावेत.
शरीरात होणाऱ्या बदलांच्या परिणामामुळे काहीवेळा वारंवार लघवीला होते. डायबिटीस, यूरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन ओव्हरअॅक्टिव ब्लॅडर सिंड्रोम, प्रोस्टेट ग्रंथीमध्ये वाढ(पुरूषांमध्ये) किंवा जास्त कॅफीन-लिक्विडचे सेवन केल्यामुळे रात्रीच्या वेळी सतत लघवीला जावे लागते. रात्रीच्या वेळी तीन वेळा पेक्षा जास्त वेळ लघवीला जावे लागत असेल तर आरोग्यासंबंधित गंभीर समस्या उद्भवण्याची संकेत आहेत. लघवीमध्ये अडथळा, डिहायड्रेशन, किडनी फेलिअर, यूरिनरी ब्लॉकेज किंवा एखाद्या औषधाचा साइड इफेक्ट झाल्यानंतर सुद्धा वारंवार लघवीला जावे लागते.
Ans: बॅक्टेरियामुळे होणारा संसर्ग हे याचे सर्वात सामान्य कारण आहे, रक्तातील साखर वाढल्यामुळे शरीर जास्त लघवीद्वारे ती बाहेर टाकण्याचा प्रयत्न करते.
Ans: जर लघवीच्या पद्धतीत अचानक बदल, वेदना, ताप किंवा कंबरदुखी जाणवत असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे। साधारणपणे, युरिन टेस्ट (Urinalysis) द्वारे मूळ कारण शोधले जाते।
Ans: लघवी करताना जळजळ किंवा वेदना होणे, वारंवार लघवी लागणे, पण कमी प्रमाणात होणे






