• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Travel »
  • Horror History Of Bhangarh Fort

Bhangarh Fort Story: तांत्रिक शाप, भुताटकीच्या कथा… निर्जन भानगढ़ किल्ल्याचा भव्य इतिहास जाणून घ्या

आज आम्ही तुम्हाला नॅशनल हेरिटेजमधील एका श्रपित किल्ल्याच्या रहस्यमयी कथेविषयी सविस्तर माहिती सांगत आहोत. या किल्ल्याला भुतांची छावणी असेही म्हटले जाते. हा किल्ला एकेकाळी भव्य किल्ला म्हणून ओळखला जायचा मात्र आता हा एक निर्जन किल्ला बनला आहे. मुख्य म्हणजे या किल्ल्याच्या कोणत्याही बाजूला एकही भिंत नाही आहे. राजस्थानच्या भानगढ किल्ल्यामध्ये आत्मे पर्यटकांशी बोलण्याचा प्रयत्न करतात, असे म्हटले जाते.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 24, 2024 | 10:35 AM
Bhangarh Fort Story: तांत्रिक शाप, भुताटकीच्या कथा... निर्जन भानगढ़ किल्ल्याचा भव्य इतिहास जाणून घ्या
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

भानगड शहर आणि त्याचा किल्ला जयपूरपासून 118 किमी अंतरावर आहे. हे देशातील सर्वात झपाटलेल्या ठिकाणांपैकी एक असल्याचे सांगितले जाते. हा किल्ला 17 व्या शतकात आमेरचा मुघल सेनापती मानसिंग याचा धाकटा भाऊ राजा माधो सिंग याने बांधला होता. एकेकाळी भव्य मानली जाणारी ही जागा आता मात्र निर्जन झाली आहे. किल्ल्याच्या परिसरात हवेल्या, मंदिरे आणि निर्जन बाजारपेठेचे फक्त अवशेष उरले आहेत. संध्याकाळी सूर्यास्तानंतर येथे कोणीही जाण्याची हिंमत करत नाही.असे म्हणतात की, येथे रात्रीच्या अंधारात काही पैरानॉर्मल एक्टिविटीज होतात. मात्र असे असूनही हा सुंदर किल्ला पाहण्यासाठी येथे अनेक पर्यटक येत असतात.

श्रापाने घडते असे काही

किल्ल्याची एक सर्वात विचित्र गोष्ट जी तुम्हाला पाहून आश्चर्य वाटेल. षी गोष्ट म्हणजे येथे बांधलेल्या एकाही घराला छत नाही. घराची संपूर्ण रचना बनली आहे, परंतु त्यापैकी एकालाही छप्पर नाही. स्थानिक लोकांचे म्हणणे आहे की, घरांना छत नसल्यामुळे ती जेव्हाही बांधली जातात तेव्हा ती खाली पडतात. या जागेला बाळुनाथाचा शाप आहे हे इथल्या प्रत्येक मुलाला माहिती आहे.

इतक्या कथा की इतिहासकारही गोंधळून जातात

ओटीटी प्लॅटफॉर्म डिस्कव्हरी प्लसवर रिलीज झालेल्या ‘एकांत’ या शोमध्ये इतिहासकार डॉ. रीमा आहुजाने संभाषण केले होते. त्या म्हणाल्या की, भानगढबद्दल इतक्या कथा आहेत की इतिहास कोठे सुरू होतो आणि कुठे संपतो हे सांगणे सामान्यांना कठीण आहे. ही जागा इतिहासकारांसाठीही एक समस्या आहे. ती सांगते की, काही कथा खूप जुन्या आहेत. काही भुताच्या कथा आहेत. पूर्वीच्या काळी कोणीतरी राजा किंवा राजकुमारीला शाप दिला. रीमा सांगतात की, अनेकदा आपण पाहतो की लोक अशा गोष्टींबद्दल अधिक उत्सुकता वाटत असते. या कारणास्तव अशा कथा प्रचलित होत असतात. पण, या जागेचे संपूर्ण सत्य काय आहे, हे अद्याप कोणालाही माहिती नाही.

हेदेखील वाचा – Shravan Travel: लग्न जमण्यात अडचण येतेय? मग ‘या’ प्रसिद्ध शनिमंदिरांना एकदा भेट देऊन पहा

संत बाळुनाथ आणि महाराजांची कथा

भानगडचे महाराज माधो सिंग हे संत बाळुनाथांचे भक्त होते. बाळुनाथने महाराजांनी तपश्चर्या करण्यासाठी महाराजांना एक गुहा बांधण्यास सांगितले. राजाने लगेच होकार देऊन गुहा बांधली. बाळुनाथ तपश्चर्या करण्यासाठी त्या गुहेत गेला. पण महाराज आणि संत बाळुनाथ यांच्यातील संबंध पाहून दरबारातील पुजाऱ्यांना हेवा वाटू लागला. पुजाऱ्यांनी दोघांना वेगळे करण्याची योजना आखली. त्यांनी एका मांजरीला मारून गुहेत फेकून दिले. दोन-तीन दिवसांनी मांजरीच्या मृत शरीरातून दुर्गंधी पसरू लागली तेव्हा पुजाऱ्यांनी राजाला संत बाळुनाथ गुहेत मरण पावल्याची माहिती दिली.

संताने दिला श्राप

बाळुनाथ संत मरण पावल्याची खोटी माहिती मिळाल्यानंतर महाराजा माधोसिंग अतिशय दुःखी झाले. ते गुहेत गेले, पण वासामुळे त्यांना आत शिरता आले नाही. त्यांनतर त्यांनी गुहा बंद करण्याचे आदेश दिले. तर दुसरीकडे संत बाळुनाथ यांची तपश्चर्या पूर्ण झाल्यावर त्यांचा बाहेर जाण्याचा मार्ग बंद झाल्याचे दिसले. यानंतर संत बाळुनाथ संतप्त झाले आणि त्यांनी भानगडचा संपूर्ण नाश व्हावा असा शाप राजाला दिला. यानंतर काय झाले हे कोणाला माहिती नाही. मात्र यानंतर भानगड पूर्णपणे उद्ध्वस्त झाला, घरांची छप्परे पडली. तेव्हाही असेच होते आणि आताही येथील घरांवर छप्पर बांधले की ते कोसळते, असे स्थानिक लोकांचे म्हणणे आहे.

जंगलामध्ये संतांची समाधी बांधली आहे

आपली चूक लक्षात आल्यानंतर राजाने संताची समाधी बांधून दिली
किल्ल्यामागील जंगलात बाळुनाथाची समाधी आजही आहे
इतिहासकार या नावाच्या संताच्या अस्तित्वाची पुष्टी करत नाहीत
बालकनाथ नावाचे संत होते असे इतिहासकार मानतात
मात्र, तो कोणत्या कालखंडातील व कोणत्या क्षेत्रातील होता हे कळू शकलेले नाही

भानगड किल्ला दिल्लीपासून 283 किमी अंतरावर आहे

हा किल्ला जयपूर आणि अलवर शहरादरम्यान असणाऱ्या अभयारण्यापासून 50 किलोमीटर अंतरावर बांधण्यात आला आहे. राजस्थानच्या बाहेरील शहरांमधून तुम्ही बस किंवा टॅक्सीने अलवरला पोहोचू शकता. हे ठिकाण दिल्लीपासून सुमारे 283 किमी आणि जयपूरपासून सुमारे दोन तासांच्या अंतरावर आहे. तुम्ही इथे भेट देत असाल तर अलवरमधील बाला किल्ला आणि अलवर सिटी पॅलेसला भेट द्यायला विसरू नका.

Web Title: Horror history of bhangarh fort

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 24, 2024 | 10:35 AM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! महागाई भत्त्यात वाढ, पगार-पेन्शनमध्ये किती वाढ होईल?

DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! महागाई भत्त्यात वाढ, पगार-पेन्शनमध्ये किती वाढ होईल?

कराड-ढेबेवाडी मार्गावर अपघात; कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात दुचाकीस्वाराचा मृत्यू

कराड-ढेबेवाडी मार्गावर अपघात; कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात दुचाकीस्वाराचा मृत्यू

शरीरातून नष्ट होतेय मांस शिल्लक राहतोय सांगाडा? Vitamin B12 च्या कमतरतेची 4 लक्षणे दिसताच खा 10 पदार्थ, वाढेल स्टॅमिना

शरीरातून नष्ट होतेय मांस शिल्लक राहतोय सांगाडा? Vitamin B12 च्या कमतरतेची 4 लक्षणे दिसताच खा 10 पदार्थ, वाढेल स्टॅमिना

Virar News :’एकही हिंदू मुलगी सोडू नका’, गरबा खेळायला येणाऱ्या तरुणींबाबत अश्लील चॅट व्हायरल, लव्ह जिहादचा आरोप

Virar News :’एकही हिंदू मुलगी सोडू नका’, गरबा खेळायला येणाऱ्या तरुणींबाबत अश्लील चॅट व्हायरल, लव्ह जिहादचा आरोप

जुबिन गर्गच्या मृत्यूनंतर १२ दिवसांनी मोठी कारवाई; गायकाच्या मॅनेजरला केली अटक

जुबिन गर्गच्या मृत्यूनंतर १२ दिवसांनी मोठी कारवाई; गायकाच्या मॅनेजरला केली अटक

नवरात्रोत्सवात अभिज्ञा भावेने उलगडले तिच्या निस्वार्थ सेवाभावाचं रहस्य, म्हणाली; “मी स्कंदमातेच्या गुणांशी स्वत:ला जोडते”

नवरात्रोत्सवात अभिज्ञा भावेने उलगडले तिच्या निस्वार्थ सेवाभावाचं रहस्य, म्हणाली; “मी स्कंदमातेच्या गुणांशी स्वत:ला जोडते”

जीएसटी कपातीनंतरही विक्रीत घट, ‘या’ कारणाने किराणा-इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्र संकटात

जीएसटी कपातीनंतरही विक्रीत घट, ‘या’ कारणाने किराणा-इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्र संकटात

व्हिडिओ

पुढे बघा
Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना

Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना

Nashik : शेतकऱ्यांच्या भरलेल्या पिकांमध्ये पाणी, पिकांचे मुळ बंद झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान

Nashik : शेतकऱ्यांच्या भरलेल्या पिकांमध्ये पाणी, पिकांचे मुळ बंद झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान

Sindhudurg News : 43 हजार शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पीक विमा भरपाई

Sindhudurg News : 43 हजार शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पीक विमा भरपाई

Kalyan : कल्याण मेट्रोच्या कामाला वेग, वाहतूक कोंडीमुक्त शहराचा संकल्प ‪

Kalyan : कल्याण मेट्रोच्या कामाला वेग, वाहतूक कोंडीमुक्त शहराचा संकल्प ‪

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये ओवेसींच्या सभेला पोलिसांची परवानगी, तयारी जोमात

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये ओवेसींच्या सभेला पोलिसांची परवानगी, तयारी जोमात

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये तणाव;  ‘दुर्गा दौड’ वादात, धार्मिक भावना दुखावल्याने गोंधळ

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये तणाव; ‘दुर्गा दौड’ वादात, धार्मिक भावना दुखावल्याने गोंधळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.