Realme Smartphone Price Hike: ग्राहकांना बसला मोठा झटका! 4000 रुपयांपर्यंत वाढल्या 'या' स्मार्टफोनच्या किंमती, जाणून घ्या
टिप्स्टर अभिषेक यादवने त्यांच्या एक्स अकाऊंट पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे की, कंपनीने त्यांच्या स्मार्टफोनच्या किंमती 3 ते 4 हजार रुपयांनी वाढवल्या आहेत. अभिषेक यादवने या माहितीसोबतच एक स्क्रीनशॉट देखील शेअर केला आहे. ज्यामध्ये कंपनीने भागीदाराला एक ईमेल लिहिला आहे, ज्यामध्ये असे म्हटले आहे की मेमरी, चिपसेट आणि एकूण स्मार्टफोनची किंमत वाढली आहे, ज्यामुळे किंमत एडजस्टमेंट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
realme smartphones just got pricier in India realme has officially increased prices by ₹3,000–₹4,000 due to rising memory, chipset & ecosystem costs. 📅 Effective from Feb 11, 2026 🔺 Price hike details:
• realme 15 5G → +₹3,000
• realme 16 Pro 5G → +₹3,000
• realme… pic.twitter.com/4R9RcyQRkd — Abhishek Yadav (@yabhishekhd) February 10, 2026
रियलमीने अलीकडेच लाँच करण्यात आलेल्या Realme 16 Pro सीरीज आणि Realme 15 च्या किंमतीत वाढ केली आहे. Realme 15 5G स्मार्टफोन कंपनीने 25,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच केला होता, ज्याची किंमत आता 3 हजार रुपयांनी वाढली आहे. त्यामुळे आता Realme 15 5G स्मार्टफोनची किंमत 28,999 रुपये झाली आहे. Reame 16 Pro स्मार्टफोन 31,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच केला होता, ज्याची किंमत आता 3 हजार रुपयांनी वाढली आहे. त्यामुळे Reame 16 Pro स्मार्टफोन 34,999 रुपयांत खरेदी केला जाऊ शकतो.
Realme 15 (8GB + 128GB) डिव्हाईस 25,999 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आले होते, ज्याची किंमत 3 हजार रुपयांनी वाढली आहे. आता हे स्मार्टफोन व्हेरिअंट 28,999 रुपयांत खरेदी केले जाऊ शकते. Realme 15 (8GB + 256GB) डिव्हाईसची किंमत 27,999 रुपये होती, जी आता 3 हजार रुपयांनी वाढली आहे. आता हा स्मार्टफोन 30,999 रुपयांत खरेदीसाठी उपलब्ध आहे. Realme 15 (12GB + 256GB) स्मार्टफोन 29,999 रुपयांऐवजी 32,999 रुपयांत खरेदीसाठी उपलब्ध आहे. Realme 16 Pro (8GB + 128GB) स्मार्टफोन 31,999 रुपयांऐवजी 32,999 रुपयांत खरेदीसाठी उपलब्ध आहे.
Meta चा मास्टरस्ट्रोक! Snapchat ला टक्कर देण्यासाठी लवकरच लाँच करणार नवं अॅप, असे असतील फीचर्स
Realme 16 Pro (12GB + 256GB) हा स्मार्टफोन 36,999 रुपयांत लाँच करण्यात आला होता, ज्याच्या किंमतीत 3,000 रुपयांची वाढ झाली आहे. आता हे डिव्हाईस 39,999 रुपयांत खरेदीसाठी उपलब्ध आहे. Realme 16 Pro+ (8GB + 128GB) हा स्मार्टफोन 39,999 रुपयांत लाँच करण्यात आला होता, ज्याच्या किंमतीत 4,000 रुपयांची वाढ झाली आहे. आता हे डिव्हाईस 43,999 रुपयांत खरेदीसाठी उपलब्ध आहे. Realme 16 Pro+ (8GB + 256GB) हा स्मार्टफोन 41,999 रुपयांत लाँच करण्यात आला होता, ज्याच्या किंमतीत 4,000 रुपयांची वाढ झाली आहे. आता हे डिव्हाईस 45,999 रुपयांत खरेदीसाठी उपलब्ध आहे. Realme 16 Pro+ (12GB + 256GB) हा स्मार्टफोन 44,999 रुपयांत लाँच करण्यात आला होता, ज्याच्या किंमतीत 4,000 रुपयांची वाढ झाली आहे. आता हे डिव्हाईस 48,999 रुपयांत खरेदीसाठी उपलब्ध आहे.






