काय आहे Paranormal Tourism, ज्यात लोक 'भूत' शोधायला जातात; भारतात याची क्रेझ का वाढत आहे?
टुरिझम हे भारतातील सर्वात मोठे सर्व्हिस सेक्टर आहे. देशाच्या जीडीपीमध्ये ते 6% पेक्षा जास्त योगदान देते. देशाच्या एकूण रोजगारामध्ये ते 8% पेक्षा जास्त योगदान देते. अलीकडच्या काळात भारतातील टुरिझम लक्षणीरित्या वाढले आहे. देशात अशी अनेक ठिकाणे आहेत, जिथे करोडो पर्यटक येतात. त्यातच आता देशात पॅरानॉर्मल टुरिझमदेखील वाढत आहे. अशात टुरिझम नक्की काय आहे? असा प्रश्न अनेकांना पडत असतो. याची क्रेझ सध्या भारतात वेगाने वाढत आहे. ही क्रेझ वाढण्यामागचे कारण आणि हे नक्की काय आहे ते सविस्तर या लेखात जाणून घेऊयात.
काय आहे पॅरानॉर्मल टुरिझम?
पॅरानॉर्मल हा शब्द असामान्य गोष्टींसाठी वापरला जातो. पण पॅरानॉर्मल टुरिझमचे नाव तुम्ही कधी ऐकले आहे का? नसल्यास, आम्ही तुम्हाला सांगतो. वास्तविक, पॅरानॉर्मल टुरिझम म्हणजे काही भयावह ठिकाणांना भेट देणे. ज्या ठिकाणी भीतीदायक घटना घडल्या आहेत. किंवा काही असामान्य घटना घडली असावी. या ठिकाणांना भेट देण्यासाठी लोकांच्या मनात खूप उत्साह निर्माण होतो. या झपाटलेल्या ठिकाणांची माहिती घेण्यासाठी लोक येथे जातात. अशा ठिकाणी बहुतेकदा भुतांचे वास्तव असल्याचे सांगितले जाते, ज्यामुळे या भुतांना पाहायला आणि त्यांच्याशी संवाद साधायला लोक या ठिकाणांना भेट देत असतात .
यामुळे भारतात वाढत आहे याची क्रेझ
आजकाल भारतात पॅरानॉर्मल टुरिझमची क्रेझ वाढत आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे सोशल मीडिया. याद्वारे यूट्यूब, इंस्टाग्राम आणि इतर ठिकाणांवर भारतातील भितीदायक, अड्डा आणि रहस्यमय ठिकाणांबद्दल बरीच माहिती दिली जात आहे. जे लोकांना स्वतःकडे आकर्षित करत आहेत. लोक या ऐतिहासिक आणि रहस्यमय गोष्टींकडे आकर्षित झाले आहेत आणि येथे भेट देत आहेत.
याशिवाय बॉलिवूडचाही यात मोठा वाटा आहे. असे अनेक चित्रपट आणि वेब सिरीज वास्तविक घटनांवर आधारित हॉरर थीमवर बॉलिवूडमध्ये बनवल्या जात आहेत. हे पाहिल्यानंतर लोकांना या ठिकाणांना भेट द्यायला आवडते. तर काही लोकांना थ्रिल आणि साहसाची आवड असते त्यांना अशा ठिकाणी जायला आवडते. हे ठिकाण पछाडलेले असल्याने काहीतरी नवीन एक्सपीरियन्स करण्यासाठी अनेकजण अशा ठिकाणांना भेट द्यायला जातात.
राजस्थानचा भानगड किल्ला
भानगडचा हा किल्ला केवळ भारतातीलच नव्हे तर आशियातील सर्वात ‘झपाटलेला’ किल्ला मानला जातो. या किल्ल्यात तांत्रिकाचा आत्मा फिरतो असे म्हणतात. त्यामुळे इथे लोकांना पायलचा आवाज ऐकू येतो. अनेकांना येथे काही गूढ शक्तीचे अस्तित्व देखील जाणवले आहे. सूर्यास्तानंतर या ठिकाणी जाण्यासही मनाई आहे.
पुण्याचा शनिवार वाडा किल्ला
पुण्याचा हा शनिवार वाडा किल्ला पुण्यातील सर्वात रहस्यमय आणि भितीदायक किल्ला मानला जातो. या किल्ल्यात रघुनाथरावांनी तरुण पेशव्याला ठार मारले होते, अशी कथा आहे. ज्याचे वय खूपच लहान होते. लोकांच्या मते आजही त्यांचा आवाज इथे ऐकू येतो.
आसाममधील जटिंगा गाव
आसाममधील हे गाव दिमा हसाव जिल्ह्यात आहे. हे गाव रहस्यमय घटनांसाठी प्रसिद्ध आहे. ‘पक्षी आत्महत्या’मुळे हे गाव जगभर ओळखले जाते. दरवर्षी येथे अनेक पक्षी विचित्र पद्धतीने मरतात.
गुजरात डुमास बीच
गुजरातच्या डुमस बीचला हांटेड बीच म्हणतात. गुजरातमधील डुमस बीच येथे घडणाऱ्या अनेक रहस्यमयी ऍक्टिव्हिटीजसाठी ओळखले जाते. लोकांच्या मते इथून अनेक विचित्र आवाजही येत असतात.
राजस्थानमधील कुलधारा गाव
राजस्थानमधील कुलधारा गाव हे भारतातील सर्वात रहस्यमयी गाव आहे. जोधपूरपासून ते 18 किलोमीटर अंतरावर आहे. हे गाव ‘शापित गाव’ म्हणून ओळखले जाते. लोकांनी हे गाव रातोरात रिकामे केल्याचे सांगितले जाते.