अहिल्यानगर जिल्ह्यात सलग काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सोयाबीन, ऊस, कांदा, उडीद, तुर, मगरीसह अनेक पिके पाण्यात गेली असून तब्बल ८७ हजार हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाल्याची नोंद प्रशासनाकडे आहे. कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी आज जामखेड तालुक्यातील परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी मोहरी प्रकल्पाचा बांध फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेल्याचे निदर्शनास आणून दिले. तसेच सरकारने तात्काळ शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी केली. विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनाही त्यांनी या बाबत पुढाकार घेण्याचे आवाहन केले.