(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
ऋषभ शेट्टीचा आगामी चित्रपट “कांतारा चॅप्टर १” उद्या, २ ऑक्टोबर रोजी दसऱ्याच्या मुहूर्तावर प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच चर्चेत आला आहे. ऋषभ शेट्टी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. चित्रपटाचे नवीन गाणे “रिबेल” नुकतेच रिलीज झाले आहे. पंजाबी गायक दिलजीत दोसांझने हे गाणे गायले आहे. विशेष म्हणजे, या गाण्यात दिलजीत देखील पडद्यावर दिसत आहे. दिलजीत आणि ऋषभ शेट्टी दोघेही ढोल वाजवताना दिसत आहेत.
‘जे प्रेमात मरतात…’, धनुष आणि क्रिती सेननची दिसली जबरदस्त केमिस्ट्री; ‘Tere Ishk Mein’ टीझर रिलीज
दिलजीत वेगळ्या लूकमध्ये दिसला
“कांतारा चॅप्टर १” मधील “रिबेल” या नवीन गाण्यात दिलजीत दोसांझ एक सरप्राईज पॅकेज आहे. तो केवळ गाण्यातच नाही तर पडद्यावरही प्रेक्षकांना दिसणार आहे गाण्यात दिलजीत जांभळ्या रंगाचा पोशाख आणि पगडी घालून, पांढऱ्या रंगाचा धोतरमध्ये दिसत आहे. गायकाने नोजपिन देखील घातली आहे. गाण्यात विविध दृश्ये आहेत. दिलजीत मोठ्या उत्साहाने गाण्यामध्ये नाचताना दिसला आहे. “रिबेल” हे एक जीवंत गाणे आहे. गाण्याच्या शेवटी दिलजीतसोबत ऋषभ शेट्टी देखील दिसतो. यानंतर दोघेही ढोल वाजवताना दिसत आहेत.
चाहते या गाण्याची आतुरतेने पाहत आहे वाट
‘रिबेल’ हे ‘कांतारा: चॅप्टर १’ मधील दुसरे गाणे आहे. यापूर्वी चित्रपटाचे ‘ब्रह्मा कलश’ हे गाणे प्रदर्शित झाले होते. आता, चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी, निर्मात्यांनी दुसरे गाणे प्रदर्शित केले आहे. चित्रपटातील दिलजीतच्या गाण्याबद्दल आधीच खूप उत्सुकता होती आणि चाहते या गाण्याची आतुरतेने वाट पाहत होते. आता, चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी हे गाणे प्रदर्शित करून, निर्मात्यांनी चित्रपटासाठी प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढवली आहे.
Asha Bhosale: आशा भोसलेंची AI विरुद्ध थेट हायकोर्टात याचिका; नेमका विषय काय?
‘कांतारा: चॅप्टर १’ कधी होणार प्रदर्शित
‘कांतारा: चॅप्टर १’ चित्रपट २ ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. ऋषभ शेट्टी लिखित आणि दिग्दर्शित या चित्रपटात गुलशन देवैया आणि रुक्मिणी वसंत देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाने बरीच चर्चा निर्माण केली आहे आणि प्रेक्षक त्याच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. “कांतारा चॅप्टर १” बॉक्स ऑफिसवर काय कामगिरी करतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.