महाराष्ट्र शासनाने जुन्या नियमांचे अधिक्रमण करून राज्यात नवीन ‘महाराष्ट्र माहितीचा अधिकार नियम, २०२६’ लागू केले आहेत. नवीन नियमांनुसार अर्ज शुल्कात वाढ करण्यात आल्यामुळे माहिती अधिकार कार्यकर्त्यांमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे. शासनाच्या या निर्णयाचा विरोध करत नाशिक येथील कार्यकर्त्यांनी राळेगण सिद्धी येथे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेऊन त्यांना परिस्थितीची माहिती दिली. अर्जाचे तिकीट शुल्क १० वरून ३० रुपये केल्याने अण्णा हजारेंनी संताप व्यक्त करत ‘शासन पैसे कमवण्याच्या मागे लागले आहे’ अशी टीका केली. मुख्यमंत्र्यांनी या निर्णयात बदल न केल्यास त्यांच्याविरोधात तीव्र उपोषण करण्याचा इशारा देत समाजावरील अन्यायाविरुद्ध वयाच्या ९० व्या वर्षीही पुन्हा एकदा उपोषण करण्यास आपण मागे हटणार नसल्याचे हजारेंनी ठामपणे सांगितले. दरम्यान माहिती अधिकारी कार्यकर्त्यांकडून निर्णयाबाबत संवाद साधलाय आमचे अहिल्यानगरचे प्रतिनिधी गिरीश रासकर यांनी…